याबाबत सविस्तर वृत्त असे की ७५वा भारतीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणास कळमसरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सखुबाई भील, माजी सरपंच श्रीमती अन्नपूर्णाबाई गोसावी, उपसरपंच रवींद्र राजपूत, मुख्याध्यापक वाय. व्ही. पाटील, पोलीसपाटील विनय माळी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी कोरोनायोद्धा म्हणून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कार्यकर्तींचा सन्मान करण्यात आला. मांडळ येथील लीना तानाजी माळी, आशा स्वंयसेविका व अंगणवाडी सेविका मीना जगदीश सोनवणे, कळमसरे येथील आशा स्वंयसेविका, कविता सुनील शिरसाठ, सीमा रवींद्र राजपूत व अंगणवाडीसेविका, तापाबाई भिवसन माळी व योगिता पंडित माळी, अजंदे येथील आशा स्वयंसेविका, प्रतिभा गणेश माळी व अंगणवाडी सेविका, सुरेखा रमेश पाटील, प्रतिभा भगवान कोळी, तसेच पोलीस दलातील गोविंद रमेश बोरसे, वैज्ञानिक सहायक, फॉरेन्सिक लॅब नाशिक, माजी विद्यार्थी व सेनादलातील सुभेदार, संजय रघुनाथ निकम ,यांचा विद्यालयाकडून मान्यवरांच्या हस्ते स्नेहवस्त्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कळमसरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सखूबाई भिल यांचा ही याप्रसंगी वैशाली सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, माजी जनरल मॅनेजर, कॉटन फेडरेशन, व म. फुले विद्या प्रसारक संस्था धुळेचे संचालक, कै. दंगलराव रतन महाजन, रा. कापडणे यांच्या स्मरणार्थ इयत्ता आठवी, नववी व इयत्ता दहावी या वर्गात प्रथम व द्वितीय पटकविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी श्री प्रशांत महाजन यांच्याकडून पारितोषिक सुरू करण्यात आले. त्याचे आज वितरणही करण्यात आले. यात इयत्ता आठवीतील गणेश माळी, दीपाली पाटील, इयत्ता नववी भूमिका पाटील ,भूमीका भारती, व इयत्ता दहावीतील संजना माळी, सायली गोसावी, यांना रोख बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी व पालक हजर होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक वाय. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक ए. डी. महाजन यांनी केले.