लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्हा परिषदेतील वर्ग तीनच्या पाच कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. गेल्या तीन महिन्यात एकूण १५ कर्मचाºयांना पदोन्नती देण्यात आलेली आहे.महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटननेच्या पाठपुराव्यामुळे मार्च महिन्यात सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर १, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर २ व वरिष्ठ सहाय्यक पदावर ७ कर्मचाºयांना पदोन्नती देण्यात आली होती. मात्र काही कर्मचाºयांची पदोन्नती रखडलेली होती.यात कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजय पाटील यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी पदी, वरिष्ठ सहायक अधिकारी प्रशांत चव्हाण यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारीपदी व कनिष्ठ सहायक असलेले संजय कोकणी, प्रशांत कुलकर्णी, सुरेखा जाधव यांना वरिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती देण्यात आली. यासाठी महाराष्ट्र राज्य जि.प.लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना धुळेचे गटनेते वनराज पाटील, जिल्हाध्यक्ष एकनाथ चव्हाण, कार्याध्यक्ष सतिष पाटील, सरचिटणीस मंगेश राजपूत यांच्यासह सर्व कर्मचाºयांनी समाधान व्यक्त केले.
पाच कर्मचाऱ्यांना मिळाली पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:52 IST