शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

खड्डयातील तुंबलेल्या पाण्यात मासे पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:49 IST

कापडणे : ग्रामस्थांचे प्रतिकात्मक अभिनव आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : गावातील  छत्रपती शिवाजी महाराज  व  ग्रामदेवता भवानी माता मंदिर चौकात रस्त्यावर मोठे  खड्डे पडले आहे. गावाला पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनला लागलेल्या गळतीचे पाणी आणि परिसरातील तुंबलेल्या गटारीचे पाणी वाहत येऊन या खड्डयामध्ये साचले आहे. त्यामुळे चौकात चिखल झाले आहे. या पाण्यात उत्पन्न झालेले  मासे  पकडण्याचे आंदोलन करुन संतप्त ग्रामस्थांनी आपली नाराजी व्यक्त केली. कारण   रस्त्यावरील खड्डे बुजण्याची आणि गटारी स्वच्छ करण्याची मागणी करुनही याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.  गावातील या  चौकातील रस्त्याची गेल्या वर्षभरापासून दुरवस्था झाली असून  मोठमोठे खड्डे झाले आहे.  या   चौकातूनच गावातील जिल्हा परिषद  व खाजगी माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयमध्ये  विद्यार्थी जात असतात.   कापडण्यासह, धनुर, लोनकुटे,तामसवाडी ,न्याहळोद ,कौठळ ,बिलाडी, धमाने सर्व गावातील   प्रवासी याच रस्त्यावरुन नेहमी ये जा करत असतात. बाहेरगावावरून कापडणे गावात पाहुणेमंडळी आल्यावर या भवानी चौकातच प्रथमत: उतरतात उतरल्याबरोबर सर्वांनाच घाण चिखलयुक्त रोडवरून मार्गस्थ व्हावे लागते. याठिकाणी अनेकदा मोटारसायकलचे छोटे मोठे अपघात होत असतात. रस्त्याच्या दुरुस्तीची आणि पाण्याच्या गळती थांबविण्याचे तसेच तुंबलेल्या गटारी स्वच्छ करण्याची वारंवार मागणी करुनही  ग्रामपंचायतीकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचा निषेध म्हणून रविवारी संतप्त ग्रामस्थांनी हे अभिनव आंदोलन केले. या आंदोलनात हनुमंत शामराव पाटील, भानुदास पाटील, रोहिदास चौधरी, गणेश गुरव, जगदीश बोरसे, शामराव पाटील, गणेश पाटील, शानाभाऊ माऊली ,गोपाल माळी , समाधान बोरसे ,ज्ञानेश्वर माळी ,दत्तात्रय पाटील, भुषण पाटील, भरत  पाटील, दिनेश खलाने ,मोतीलाल माळी ,येडू महाजन, रावसाहेब पाटील   आंदोलनात सहभागी होते.

टॅग्स :Dhuleधुळे