शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी २४० जणांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 12:17 IST

शिवभोजन योजना कार्यान्वित : पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनीही घेतला आस्वाद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :राज्य शासनाच्या ‘शिवभोजन’ या १० रूपयात जेवण देण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा २६ जानेवारीपासून प्रारंभ झालेला आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या योजनेचे उदघाटन झाल्यानंतर पालकमंत्रीसह जिल्हाधिकाऱ्यांनीही ‘शिवभोजन’चा आस्वाद घेतला. दरम्यान पहिल्या२४० जणांनी या योजनेचा लाभ घेतला.राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्याची महत्वकांक्षी योजना राज्य शासनाने सुरु केली आहे.धुळे जिल्ह्यात शिव भोजन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याअंतर्गत धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील शेखर पांडुरंग वाघ यांच्या शिव भोजन केंद्राचे उदघाटन पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सत्तार,जिल्हाधिकारी गंगाथरन डी., हिलाल माळी यांनीही शिवभोजन घेतले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी आदी उपस्थित होते.धुळे शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती, डॉ.भाऊसाहेब हिरे मेडीकल कॉलेज, तसेच मध्यवर्ती बसस्थानक अशा एकूण चार ठिकाणी ही योजना सुरू झालेली आहे. पहिल्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीत ६१, हिरे वैद्यकीय महाविद्यालयात २९, व बसस्थानकात १५० अशा एकूण २४० जणांनी पहिल्या दिवशी याचा लाभ घेतला.ही केंद्रे दुपारी १२ ते २ या कालावधीत सुरू राहतील. या भोजनात दोन चपाती, एक वाटी भाजी, एक मूद भात, एक वाटी वरणाचा समावेश आहे.

टॅग्स :Dhuleधुळे