शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात भरदिवसा जेवणाच्या वादातून हवेत गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 18:25 IST

हॉटेलमधील थरार : दहशत माजविण्याचा तरुणांचा प्रयत्न

ठळक मुद्देमालेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या वादातून हवेत गोळीबारहॉटेलमध्ये दहशत माजवित धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न चाळीसगाव रोड पोलीस फौजफाटा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मालेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या वादातून काही युवकांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला़ यात एकाने गावठी कट्टा काढून गोळीबारही केला़ सुदैवाने जिवीतहानी झाली नसलीतरी भितीयुक्त वातावरण हॉटेल परिसरात मात्र निर्माण झाले होते़ शहरातील मालेगाव रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळील एका हॉटेलमध्ये दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोन जण दाखल झाले़ यावेळी काही वेळातच जेवणाच्या वादावरुन हॉटेलचा कामगार आणि त्यांच्यात शाब्दीक चकमक उडाली़ दोघांमध्ये वाद झाल्याने हाणामारी झाली़ खुर्च्यांची फेका-फेक झाल्याने नुकसान झाले़ परिणामी तणावाची स्थिती निर्माण झाली़ अशात या दोघांनी काही जणांना मोबाईलवरुन संवाद करत बोलावून घेतले़ अल्पावधीतच ते शस्त्रास्त्रसहीत दाखल झाले़ यातील एकाने गावठी कट्टाच आणल्याने तणाव अधिकच वाढला होता़ त्याने गोळीबार केला़ पण, सुदैवाने गोळी कोणालाही लागली नसल्याने जिवीतहानी झाली नाही़ घटनास्थळावरुन हुल्लडबाजी करणारे तरुण पळून गेले़ तर भिती निर्माण झाल्याने हॉटेल कामगार देखिल नाहीसा झाला आहे़ घटनेचे वृत्त कळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ हे आपल्या पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले़ त्यांनी प्राथमिक तपासणी केली आहे़ सीसीटीव्ही फुटेजचे संकलन केले जाणार असून त्याद्वारे अधिक माहिती समोर येण्यास मदत होणार आहे़ दरम्यान, हॉटेलमध्ये दहशत माजवित धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न झाला़ गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे़ वस्तुत: तसे काही दिसत नसलेतरी तपासणीतून ही बाब समोर येईल़ सीसीटीव्हीचे फुटेजची पाहणी केली जाईल, असे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी सांगितले़