धुळे : सुरत येथील खासगी कोचिंग क्लासेसच्या २२ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभुमीवर उपाययोजना व दक्षता म्हणुन महापालिका प्रशासनाकडून क्लासेसना अग्निरोधक साहित्य लावण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली. शहरातील शाळा, महाविद्यालय तसेच खाजगी इमारतींच्या फायर आॅडीटकडे महापालिका प्रशाासनाचे दुर्लक्ष असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केले होते़ तर खबरदारी म्हणून कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी अग्निरोधक उपाय योजना करण्यासाठी महापालिका अग्निशमन दलातील अधिकाºयांची भेट घेतली. तसेच शहरातील शाळा, महाविद्यालयासह, क्लासेसना अग्निरोधक साहित्य लावण्याची मागणी केली होती़ अग्निशमन विभागाकडून शहरातील शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, खासगी व शासकीय कार्यालयात अग्निरोधक साहित्य बसविण्यात आले आहे किंवा नाही, याची माहिती घेण्यात येणार आहे़ क्लासेसमध्ये पार्टिशनसाठी फायबर व लाकडाचा उपयोग करू नये. क्लासेसच्या ठिकाणी किचनचा समावेश नसावा, अशी तरतूद आहे. तसेच जिना मोकळा असावा तसेच महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली अग्निरोधक साहित्य क्लासेसमध्ये बसविण्याची सुचना क्लासेच चालकांना देण्यात आल्या आहेत़ दरम्यान शहरात साधारणपणे २०० खासगी क्लास असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे़
अग्निरोधक साहित्य बसविण्यात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 13:21 IST