शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात मैत्रेय कंपनीच्या कार्यालयाला आग; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 12:41 IST

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया  सुरू, कारण अद्याप गुलदस्त्यात

ठळक मुद्देबुधवारी पहाटे लागली कार्यालयाला आगआगीत फर्निचर, काही कागदपत्रे जळून खाकपश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

आॅनलाईन लोकमतधुळे : शहरातील देवपूर भागात नकाणे रोडवर असलेल्या मैत्रेय सुवर्णसिद्धी प्र्रा.लि. कंपनीच्या कार्यालयास बुधवारी पहाटे आग लागली. त्यात कार्यालयातील  फर्निचर, कागदपत्रे जळाल्याने  लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण अद्याप  समजू शकलेले  नाही. मात्र आग लावल्याचा संशय व्यक्त होत आहे.  याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.देवपूर भागात ‘मैत्रेय’चे कार्यालय आहे. या कार्यालयाला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. आगीत  कार्यालयातील बहुतांश कागदपत्रे, फर्निचर जळून खाक झाले आहे.आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  आगीत कागदपत्रे जळाली असली तरी महत्त्वाची कागदपत्रे वाचली आहे. महत्त्वपूर्ण डाटा यापूर्वीच सेव्ह केल्याचे कंपनीच्या सूत्राकडून सांगण्यात आले. दरम्यान महानगरपालिकेच्या चार अग्निशमनचे बंब घटनास्थळी दाखल होत, त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.सभासद व ठेवीदारांनी गुंतविलेले पैसे परत मिळत नसल्याने कंपनी आधीच चर्चेत होती. ही आगीची घटना घडल्याने वेगवेगळ्या चर्चेला ऊत आला आहे. आग लागली नाही तर लावण्यात आल्याचे मत व्यक्त होत आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दरम्यान ‘मैत्रेय’च्या कार्यालयाला आग लागल्याचे समजताच सकाळी बघ्यांनी त्या परिसरात गर्दी केली होती. त्यात काही कंपनीच्या ठेवीदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे दिसून आले.