शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लुटीच्या इराद्याने केला कारवर फायर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 21:51 IST

वरखेडी पुलावरील घटना : तिघा संशयितांविरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा

धुळे : महामार्गावरुन जाणाºया कारवर गावठी कट्यातून गोळी झाडून चालकाला बंदुकीचा धाक दाखवत ५ लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न शनिवारी पहाटेच्या सुमारास झाला़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार आल्याने तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ दरम्यान, या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही़ घटनेनंतर मात्र बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ गुजरातमधील म्हैसाणा जिल्ह्यातील लक्ष्मीपुरा येथील      कौशिक माणिकलाल पटेल हा ३६ वर्षीय चालक एमएच १९ बीयु ४९३१ या नंबरच्या कारने साथीदारांसह इंदूर येथून मुंबईकडे जात होता़ धुळ्यानजिक मुंबई आग्रा महामार्गावरील वरखेडी पुलावरुन जात असताना शनिवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास गावठी कट्याने गोळी झाडण्यात आली़ तसेच मागावून भरधाव वेगात आलेली लाल रंगाची कार आडवी लावून त्यातून उतरलेल्या तिघा अनोळखींनी चालकाला गावठी कट्याचा धाक दाखविला़ चालकाजवळ असलेले ५ लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न केला़ या घटनेनंतर चालकाने मालकाला कळविले़ याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार देखील नोंदविली़ त्यानुसार, विविध कलमान्वये तिघा अनोळखी जणाविरुध्द गुन्हा दाखल झाला़ या अनोळखी तिघांचे वर्णन चालकाने पोलिसांना सांगितले़ त्या अनुषंगाने पोलिसांकडून शोध सुरु झाला आहे़ घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, आझादनगर पोलीस   निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली़ घटनेबाबत वरिष्ठांनी चालकाकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे़ पोलीस निरीक्षक दिनेश आहेर घटनेचा तपास करीत आहेत़ सुदैवाने जीवितहानी टळलीअचानक गावठी कट्यातून झालेल्या फायरमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ या फायरमुळे सुदैवाने कोणाची जीवितहानी झालेली नाही़ अथवा कुणाला दुखापत देखील झालेली नाही़ या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मात्र तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते़ तपास सुरु झाला आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी