शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

शहीद योगेशच्या कुटुंबाला भारत सरकारकडून एक कोटी एक लाख रुपयांची आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 15:29 IST

केंद्रीय राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी खलाणे येथे कुटुंबियांना दिले पत्र

ठळक मुद्देकेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्याकडून भदाणे कुटुंबाचे सांत्वनशहीद योगेशच्या बलिदानाचा भार तीय सैन्याने घेतला दुसºयाच दिवशी बदला तीन महिन्यात भदाणे कुटुंबाच्या खात्यावर होणार संपूर्ण रक्कम होणार जमा 

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : तालुक्यातील खलाणे येथील शहीद योगेश भदाणे यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्यावतीने १ कोटी १ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्याहस्ते देण्यात आले. शहीद कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे गुरूवारी सकाळी ११ वाजता खलाणे येथे आले. त्यांच्यासोबत प्रा.अरविंद जाधव, जि.प. सदस्य कामराज निकम, संजीवनी सिसोदे, राम भदाणे, भाजप तालुकाध्यक्ष नथा पाटील, कृउबाचे उपसभापती पंकज कदम, सरपंच भटू वाघ, विलास अहिरराव यांच्यासह  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी डॉ.भामरे यांनी शहीद योगेश यांच्या घरी त्यांची पत्नी पूनम, आई, वडील व त्यांच्या काकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आणि त्यांना केंद्र सरकारने एक कोटी  १ लाख २५ हजार ९६७ रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र दिले. शहीद योगेश यांची पत्नी पूनम यांची विचारपूस केली. तेव्हा पूनम यांनी सांगितले की, मला माझे शिक्षण पूर्ण करून जॉब करणार असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. भामरे यांना सांगितले  शहीद योगेश यांच्या कुटूंबाचे सांत्वन करून ना डॉ. भामरे यांनी ग्रा.पं. कार्यालयात ग्रामस्थांसोबत पत्रपरिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, योगेश हा खलाणे गावाचाच पुत्र नसून तो संपूर्ण देशाचा पुत्र होता. शहीद हा कधीही मरत नसून तो अमर होत असतो. त्याच्या पाठीशी संपूर्ण देशासह लष्करही त्याच्यासोबत आहे. शहीद योगेशचा बलिदानाचा बदला दुसºया दिवशी भारतीय सैन्याने तेथेच पाकड्यांचे ७ सैनिक व ६ दहशतवादी ठार करून घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहीद योगेशचे पार्थिव आणण्यासाठी स्पेशल विमानाची व्यवस्था केली. गेल्या तीन वर्षात आम्ही जगाला संदेश देण्यात सक्षम झालो असून भारत हा पूर्वीचा भारत नाही. तो जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. शहीद योगेशच्या कुटुंबाच्या पाठीशी केंद्र व राज्य शासन ठामपणे उभे आहे. केंद्र सरकारकडून त्यांना विविध हेड खाली एक कोटी एक लाख २५ हजार ९६७ रुपयेआर्थिक मदतीची घोषणा करून सदर रक्कम ही शहीद योगेशच्या कुटुंबाच्या खात्यावर ९० दिवसाच्या (तीन महिन्याच्या) आत  येतील, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कामराज निकम यांनी मानले.