शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अमरावती धरणातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:54 IST

मालपूर  : धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने पाणी सोडण्याचा घेतला निर्णय

मालपूर : अमरावती मध्यम प्रकल्पाच्या  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने, धरणातील जलसाठ्यात वाढ होणार असल्याने, या प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सोडण्यात आले. अमरावती धरण शंभर टक्के भरल्याशिवाय एक थेंब देखील पाणी सोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत मालपूर (ता. शिंदखेडा) येथील शेतकºयांनी सोमवारी अमरावती धरणाच्या गेटजवळ ठिय्या आंदोलन करीत पाणी सोडण्यास विरोध केला होता.  दरम्यान अमरावती प्रकल्पातील जलसाठ्यात जलदगतीने वाढ होत असल्याने, पाटबंधारे विभागाचे प्रभारी अभियंता प्रशांत खैरनार, उपअभियंता जी.एम. शेख यांनी मंगळवारी सकाळी प्रकल्पावर येऊन पहाणी केली. सकाळी ९ वाजेपर्यंत या प्रकल्पात २२५.१५ मीटर जलसाठा होता.  शासन निर्णयानुसार तो साठा  १० सप्टेंबरपर्यंत २२४.४५ एवढाच ठेवावा लागणार आहे. शिवाय धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने आणखी जलसाठ्यात वाढ होणार असल्याचे गांभीर्य ओळखून या प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून १५ से.मी.ने दरवाजे वर करून पाणी सोडण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे, विखरणचे सरपंच महेंद्र पवार, उपसरपंच उमेश पाटील, मालपूरचे ग्रा.प. सदस्य अरूण धनगर, बापू शिंदे, संतोष कोळी, तुकाराम माळी, भूषण रावल, पोलीस पाटील बापू बागूल, जगदीश खंडेराय, सुरेश पाटील, मगन चौधरी, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे