शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हाधिका-यांसह १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 22:09 IST

विखरणच्या सुनील पाटील यांचा दोंडाईचा पोलिसात तक्रारी अर्ज

ठळक मुद्दे- औष्णिक वीज प्रकल्पासाठी जमीन संपादन- अधिकाराचा गैरवापर करून शासनाची फसवणूक- गुन्हा दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  औष्णिक ऊर्जा प्रकल्पात शेतजमीन संपादन करतांना खोटे,बनावट दस्ताऐवज करून शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी, कृषी, महाजनको,  भूमी अभिलेखा विभागाचे अधिकारी आणि कासारे ता.साक्रीचा एजंट अशा १३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा तक्रारी अर्ज    विखरण येथील सामाजिक कार्यकर्ते   सुनील भटा पाटील  यांनी दोडाईचा पोलिसात  दिला आहे.तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील हे नरेंद्र धर्मा पाटील यांचे चुलत भाऊ आहेत. शिंदखेडा तालुक्यातील  विखरण येथील औष्णिक  ऊर्जा प्रकल्पासाठी शेत जमीन संपादीत करण्यात आली.त्यात विखरण येथील गट नम्बर ब२९०/३, गट नं २२७/१,  व गट नं २२७/२ यात   बनावट अभिलेख,   फळबाग मूल्यांकन अहवाल  व इतर दस्ताऐवज तयार केले.   तसेच शासकीय अधिकारी लोकसेवक असताना त्या अधिकाराचा गैरवापर  करुन शासनाची फसवणूक  करुन निधीचा  अपहार केला. तर एजंटने  शासकीय अधिकारी, लोकसेवक  यांच्याशी हातमिळवणी करून निधीचा अपहार केला. म्हणून याप्रकरणी भूसंपादन उपजिल्हाधिकारी पी.व्ही.सपकाळ, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, कृषी अधिकारी डॉ बबन पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी पी एम सोनवणे, शिंदखेडा तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, उपअधीक्षक शिंदखेडा जे एस राठोड, कनिष्ठ लिपिक एन आर शेळके, तात्कालीन भूमापक,  विखरण मंडळ अधिकारी आर ए नांदोळे,  विखरण तलाठी आर बी खैरनार, कनिष्ठ  अभियंता जितेंद्र पवार, धुळे महाजनको कनिष्ठ अभियंता  अजय मांजरेकर  व लोकसेवक  तसेच  भूसंपादन एजन्ट डी जे देसले  अशा १३  जणांविरोधात  भादंवि कलम ४२०, १६७, ४०६, ४०९, ४६७, ४६८, ४७१ आणि १२० ब अन्वये गुन्हा दाखल करावा, असा अर्ज विखरणचे सुनिल भटा पाटील यांनी बुधवारी दुपारी दोंडाईचा पोलीस स्टेशनला दिला.

टॅग्स :DhuleधुळेDondaichaदोंडाईचा