शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात पाचव्या दिवशी ३६ मंडळांतर्फे बाप्पाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 11:54 IST

विसर्जन मिरवणुकीत दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला, गुलालाची मुक्त उधळण

ठळक मुद्देजिल्ह्यात उत्साहत विसर्जनढोलताशांच्या गजरात निघाल्या मिरवणुकागुलालाची केली मुक्त उधळण

आॅनलाइन लोकमतधुळे : सोमवारी जल्लोषात आगमन झालेल्या गणरायाचे आता टप्या-टप्याने विसर्जन होऊ लागले आहे. पाचव्या दिवशी जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार ’ अशा गगनभेदी घोषणा देत आपल्या लाडक्या दैवताला भावपूर्ण निरोप दिला. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांनी सर्वांचेच लक्ष वेधले होते.सोमवारी विघ्नहर्ता गणरायाचे वाजत गाजत, जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. जिल्ह्यात २८८ लहान व १६४ मोठे सार्वजनिक, ५९ गावात एकगाव एक गणपती अशी एकूण ५१३ मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली.जिल्ह्यात तीन, पाच, सात, नऊ व अकरा अशा पाच टप्यात गणपतींचे विसर्जन करण्यात येत आहे.विसर्जनाच्या दुसऱ्या टप्यात अर्थात पाचव्या दिवशी जिल्ह्यात ३० सार्वजनिक व सहा एक गाव एक गणपती अशा एकूण ३६ मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यात देवपूर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन, निजामपूर पोलीस स्टेशन अंतर्गत १६ सार्वजनिक व सहा एक गाव एक गणपती, शिरपूर शहर-१, शिंदखेडा-३, दोंडाईचा-३ नरडाणा-१, शिरपूर तालुका-२, व थाळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे श्रींच्या मूर्तीचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले.धुळे शहरात अजमेरा महाविद्यालयात स्थापन केलेल्या श्रींच्या मूर्तीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. या महाविद्यालातर्फे हत्ती डोहात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.जैताणेयेथील सार्वजनिक गणेश मंडळांनी पाच दिवस उत्साहात गणेश आराधना केली. शुक्रवारी पाचव्या दिवशी श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला सायंकाळी ढोल ताशे, डीजेच्या गजरात सुरूवात झाली. यावर्षी मिरवणुकीत विशाल आकाराच्या गणेशमूर्ती तसेच सजवलेली वाहने याचे प्रमुख आकर्षण होते. मिरवणुकीत सर्वच २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य विशेष पेहरावात सहभागी झाले होते. यावेळी गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. गणरायाचा जयघोष करीत कार्यकर्ते नृत्य करण्यात तल्लीन झाले होते. मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस व गृहरक्षक दलाचे जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूक शांततेत पार पडली. 

टॅग्स :Dhuleधुळे