शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बुरशीयुक्त चारा प्रक्रिया करुनच जनावरांना खाऊ घाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 12:05 IST

संडे अँकर । अवकाळी पावसामुळे कडब्यावर ‘अ‍ॅस्परजिलस नायगर’ बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव, जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

न्याहळोद : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मका, ज्वारी, सोयाबीन सारख्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यात अवकाळी पावसामुळे या पिकांच्या कडब्यावर ‘अ‍ॅस्परजिलस नायगर’ बुरशीची मोठया प्रमाणावर वाढ होते. अशा प्रकारच्या बुरशीयुक्त कडब्यात ‘आॅक्झॅलीक अ‍ॅसीड’चे प्रमाण वाढलेले दिसते. तसेच अतिवृष्टीमुळे कपाशीत वाढणारे पाथरीसारखे बोंडाच्या फुलाचे, फुल गवतामध्ये सुद्धा ‘अ‍ॅक्झालिक अ‍ॅसीड’चे अठरा टक्के प्रमाण जास्त असते. जनावरांना अशा प्रकारचा चारा खाऊ घातल्यास जनावरांच्या रक्तातील कॅल्शियम बरोबर संयोग होऊन कॅल्शियम आॅक्झॅलेटचे स्फटीक तयार होतात, त्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन महत्वाचे अवयवाचे कार्य मंदावते किंवा थांबते व जनावरांचा मृत्यु होतो. विषबाधा ही गायी, म्हशी, शेळ्या व मेंढया इत्यादी जनावरांमध्ये बुरशीयुक्त चारा खाण्याचे प्रमाणावर अवलंबून असते.बुरशीयुक्त चारा खाल्याने बाधीत झालेल्या जनावरांमधील आजाराची लक्षणे अशी असतात- सौम्य विषबाधा झाल्याची लक्षणे १ ते १२ महिने सतत बुरशीयुक्त चाऱ्यांच्या संपर्कात असलेल्या जनावरांमध्ये आढळून येऊन जनावरांमध्ये भुक मंदावणे, संडास पातळ होणे, जनावरांचे वजन कमी होणे तसेच लाळ गळणे, जनावरे अशक्त होवून थरथर होणे, पोट फुगणे, श्वासोच्छवास घेण्यासाठी त्रास होणे, अशा परिस्थितीत जनावरे डोके पोटावर ठेवतात, लघवी थेंब-थेंब याप्रमाणे होणे, जनावरांच्या मागील बाजूस जलयुक्त सुज येणे, बध्दकोष्टता हीे लक्षणे तीव्र विषबाधेची लक्षणे दिसतात. व यामध्ये जनावरे दगावूसुध्दा शकतात.तरी पशुपालकांनी आपल्या जनावरांना बुरशीयुक्त चारा खाऊ घालण्यापूर्वी त्या चाºयावर चुन्याची निवळी शिंपडून वाळवून कुट्टी करूनच खाऊ घालावा. तसेच जनावरांना बाधा झाल्यास पशुसंवर्धन दवाखान्याशी संपर्क साधावा.अवकाळी पावसाचा गुरांनाही फटकाजिल्ह्यात सततच्या परतीच्या पावसामुळे मका, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. त्यात अतिवृष्टीमुळे विविध पिकांच्या कडब्यावर बुरशीजन्य रोग पसरल्याने गुरांसाठी चाºयाची कुठून तजवीज करावी, अशी चिंता पशुपालकांना सतावत आहे. एकंदरीत बळीराजा दुहेरी संकटात सापडला असून शासनाकडून मदतीची प्रतीक्षा लागून आहे.

टॅग्स :Dhuleधुळे