शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पिता-पुत्राची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 22:08 IST

मुलगा होता व्हेंटीलेटरवर : रुग्णालयातून घरी जाताना दोघांनाही अश्रू अनावर

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील गरीब नावाज परिसरातील रहिवासी असलेल्या पिता पुत्राने कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या पिता पुत्रावर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर बुधवारी त्यांना हिरे महाविद्यालयातून टाळ्यांच्या कडकडाटात निरोप देण्यात आला यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. कोरोनामुक्त झालेल्या पिता पुत्रापैकी २५ वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर झाली होती. त्याला जीवन रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी परत जातांना दोघांच्याही अश्रूंचा बांध फुटला होता. तुमच्यामुळेच आम्ही सुखरूप घरी परत जातो आहोत. आपले मानावे तेवढे आभार कमी आहेत अशा शब्दात त्यांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, वैद्यकीय अधिक्षक राजकुमार सुर्यवंशी, समन्वयक डॉ.दिपक शेजवळ, डॉ.निर्मलकुमार रवंदळे आदि उपस्थित होते.येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना कक्षात गुरुवारी १७ रुग्णांची तपासणी करण्यात आली़ त्यापैकी संशयित ११ रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत़ या रुग्णालयात ३० अहवालांची प्रतिक्षा आहे़ आतापर्यंत १९३० अहवाल निगेटीव्ह आले आहेत़बुधवारी रात्री उशिरा धुळे शहरातील सहा रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने शहरातील रुग्णांची संख्या ११३ झाली आहे तर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १७७ झाली आहे़ आतापर्यंत ९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़धुळे शहरातील ७४ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच शिंदखेडा तालुक्यातील सात, साक्री तालुक्यातील सहा, शिरपूर तालुक्यातील सहा तर धुळे तालुक्यातील दोन रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतलेले २२ परप्रांतीय बाधीत रूग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. धुळ्यानजीक वेगवेगळ्या अपघातात जखमी झाल्यानंतर उपचारासाठी त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.शहरातील ८ कंटेनमेंट झोन हटविलेधुळे महानगरपालिकेने शहरातील आठ कंटेनमेंट झोन हटविले आहेत़ त्यात माधवपूरा, सुरत बायपास शेजारील शिक्षक कॉलनी, भंगार बाजार अन्सार नगर, देवपूरातील नेहरु नगर, गल्ली क्रमांक ७, नकाने रोडवरील इंद्रप्रस्थ नगर, चितोड रोडवरील खंडेराव सोसायटी आणि प्रभात नगरातील झोन हटविले आहेत़ परंतु काही अटी शर्ती लागु केल्या आहेत़ या भागातील सर्व नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे़ तसेच फिजीकल डिस्टन्सिंगचेही त्यांना पालन करावे लागेल़ बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची होम क्वारंटाईनची चौदा दिवसांची मुदत कायम असणार आहे़ आरोग्य विभागातर्फे नियमीत स्वच्छता व फवारणी केली जाणार आहे़ नागरिकांना नियमांचे पालन करावे लागेल़

टॅग्स :Dhuleधुळे