शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कापूस मोजणीत घोळ करणाºया व्यापाºयाला शेतकºयांचा चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 11:43 IST

वाहनात अडीच क्विंटल दगड टाकून बनवाबनवी

ठळक मुद्देदगडामुळे कापसाचे वजन साडेतेरा क्विंटल भरलेप्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेले.  शेतकºयाने तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल नाही

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नेर येथून जवळच असलेल्या नवे भदाणे गावात कापूस मोजण्यासाठी वाहनात सुमारे अडीच क्विंटलचे दगड भरून ‘मापात पाप’ करणाºया व्यापाºयाची बनवेगिरी शेतकºयांनी उघडकीस आणली. या प्रकाराने संतप्त झालेल्या शेतकºयांनी त्यास चांगला चोपही दिला. हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेले. मात्र, शेतकºयाने तक्रार न दिल्याने याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. दिवाळी सण जवळ आल्याने कापूस विकून सण साजरा करण्यासाठी शेतकरी घरात आलेला कापूस विक्री करीत आहे. शेतात वर्षभर घाम गाळून पिकवलेला कापूस व्यापारी अगोदरच मातीमोल भावाने खरेदी करीत आहे. शेतकरीही दिवाळी साजरी करण्यासाठी आर्थिक झळ सोसून ४ हजार ते ५ हजार ४०० रुपये क्विंटल दराने कापूस विकत आहे.  हा कापूस खरेदी करताना व्यापाºयाकडून शेतकºयांची फसवणूक करण्याचा अजब फंडा नवे भदाणे येथील घटनेने समोर आला आहे. जुनेभदाणे येथील शेतकºयाचा अकरा क्विंटल कापूस तोलकाट्याने मोजून खरेदी करून व्यापाºयाने त्यात महामार्गावरील अंतर दर्शवणारे अडीच क्विंटलचे दगड भरले. त्यानंतर नेर येथील भुईकाट्यावर जाऊन मोजणी केली. दगडामुळे कापसाचे वजन साडेतेरा क्विंटल भरले. तशी पावतीही व्यापाºयाने घेतली. त्यानंतर नवे भदाणे येथील शेतकºयाचा कापूस खरेदीसाठी जाताना गाडीत ठेवलेले दगड रस्त्यात फेकून दिले. हे दगड फेकताना एका शेतकºयाने त्यांना पाहिले. त्यामुळे काही दगड गाडीतच राहिले. नवे भदाणे येथील शेतकºयाचा कापूस खरेदी केल्यावर तोल काट्यावर जाण्यापूर्वी बाकीचे राहिलेले दगड फेकून देऊ, असा विचार करुन वाहन नवे भदाणे येथे आले. येथे कापूस खरेदी सुरू केली. दरम्यान, गाडीतून दगड फेकण्याचा प्रकार पाहिलेल्या शेतकºयाने गावातील शेतकºयांना पाहिलेला प्रकार सांगितला. त्यामुळे शेतकºयांनी व्यापाºयाच्या वाहनाची झडती घेतली. त्यात मोठ्या प्रमाणावर दगड आढळून आले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी व्यापाºयाला चांगलाच चोप दिला. यानंतर हे प्रकरण नेर दूरक्षेत्र पोलीस ठाण्यापर्यंत गेले. मात्र, आपसात प्रकरण मिटवून शेतकºयाने तक्रार देण्यास नकार दिल्याने याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल होऊ शकला नाही.