शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ; दीड महिन्यात केवळ पाच शेतकऱ्यांनी केली ॲानलाइन नोंदणी

By अतुल जोशी | Updated: November 17, 2023 17:40 IST

नाफेडच्या वतीने खरीप हंगामातील मका, ज्वारी, बाजरी व रागी खरेदीसाठी १ ॲाक्टोबर २०२३पासून ॲानलाइन नोंदणी सुरू झाली आहे.

धुळे : नाफेडच्या वतीने खरीप हंगामातील मका, ज्वारी, बाजरी व रागी खरेदीसाठी १ ॲाक्टोबर २०२३पासून ॲानलाइन नोंदणी सुरू झाली आहे. यासाठी धुळे जिल्ह्यात पाच खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ॲानलाइन नोंदणीला प्रतिसादच मिळालेला नाही. गेल्या दीड महिन्यात अवघ्या पाच शेतकऱ्यांनी मका खरेदीसाठी नोंदणी केलेली आहे. ज्वारी, बाजरी, रागी खरेदीसाठी नोंदणीच झालेली नाही. ॲानलाइन नोंदणीसाठी आता ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे उरलेल्या १३ दिवसात किती नोंदणी होईल, हा एक प्रश्नच आहे.

धान्य विक्रीसाठी शेतकऱ्यांना १० ॲाक्टोबर ते ३० नोव्हेंबर २३ या कालावधीत ॲानलाइन नोंदणी करता येणार आहे. हमी भावाने खरेदीसाठी नाफेडतर्फे जिल्ह्यात धुळे, साक्री, शिरपूर व दोंडाईचा या चार ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. नाफेडतर्फे १ डिसेंबर २३ ते ३१ जानेवारी २४ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी ॲानलाइन नोंदणी केली आहे, त्यांच्या धान्याची खरेदी केली जाणार आहे. शासनातर्फे मक्याला २,०९०, ज्वारीला ३,१८० बाजरी २,५००, तर रागीला ३,८४६ रूपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात आला आहे.केवळ पाच शेतकऱ्यांकडून नोंदणी

जिल्ह्यात ॲानलाइन धान्य नोंदणीला प्रतिसाद मिळालेला नाही. गेल्या दीड महिन्यात केवळ मका खरेदीसाठी पाच शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात धुळे केंद्रावर एक व दोंडाईचा केंद्रावरील चार शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.