शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील शेतकºयांचा यावर्षीही कापूस लागवडीकडेच कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 11:44 IST

खरीप हंगाम : जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट

ठळक मुद्देजिल्ह्यात खरीपासाठी तयारी सुरूकृषी विभागाने पेरणीचे क्षेत्र केले प्रस्तावितमका, तूर, भुईमुगाचे क्षेत्र वाढणार

आॅनलाइन लोकमतधुळे : यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने लागवडीचे क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ४ लाख ४० हजार ६०० हेक्टरवर खरीपाची पेरणी प्रस्तावित केलेली आहे. गेल्यावर्षी बोंडअळीमुळे कपाशीचे नुकसान झालेले असले तरी, गेल्यावर्षाप्रमाणेच यावर्षीही २ लाख  पाच हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. यावर्षी मका, तूर, भुईमुग, ऊसाच्या क्षेत्रामध्ये थोडी वाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहे.धुळे जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्रे ३ लाख ७६ हजार हेक्टर इतके असून, २०१७-१८  मध्ये कृषी विभागाने एवढ्याच क्षेत्रावर लक्षांक निश्चित केले होते. प्रत्यक्षात खरीप हंगामात जल्ह्यात ४.३५ लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आल होती. ही लागवड सरासरीच्या तुलनेत ११६ टक्के एवढी होती.मागीलवर्षी झालेल्या अनियमित पावसामुळे मुग,उडीद यासारखी अल्पावधीच्या कालावधीच्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले होते.  त्यामुळे शेतकºयांची सर्व मदार कपाशीवर होती. मात्र आॅक्टोंबर महिन्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे कपाशीचे मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले.कपाशी लागवडीकडेच कल : गेल्यावर्षी कपाशीत शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असला तरी, यावर्षीही शेतकºयांचा कल कापूस लागवडीकडेच सर्वाधिक आहे. गेल्यावर्षी २ लाख ५ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झालेली होती. तेवढीच २०१८-१९ या खरीपाच्या हंगामात होणार आहे.मका, तुर, भूईमुग क्षेत्रात वाढ: गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मका, तुर, भुईमुगाच्या क्षेत्रात वाढ प्रस्तावित आहे. गेल्यावर्षी मुगाची ६३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित होती. यावर्षी ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी प्रस्तावित असून, गेल्यावर्षाच्या तुलनेत २५०० हेक्टरने जास्त आहे. २०१७-१८ मध्ये तुरीची ६८०० हेक्टर व भुईमुगाची १२ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित होती. २०१८-१९ मध्ये  या दोन्ही पिकांची ७७०० व १४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित आहे. दोन्ही पिकांत अनुक्रमे ९०० व १४०० हेक्टर क्षेत्र जास्त आहे. गेल्यावर्षी उसाची ११०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित होती. यावर्षी १५०० हेक्टरवर पेरणी होणे अपेक्षित असून, ती ४०० हेक्टर जास्त आहे. 

टॅग्स :Dhuleधुळेagricultureशेती