शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी शेततळ्यांकडे फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 11:45 IST

५०० पैकी फक्त ६२ शेततळे पूर्ण, कृषी विभागाने प्रोत्साहन देण्याची गरज

ठळक मुद्देआतापर्यंत ५०० पैकी फक्त ६२ शेततळे पूर्णजिल्ह्यात साक्री तालुक्यातच सर्वाधिक शेततळीशिरपूर तालुक्यात फक्त एक शेततळे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत जिल्ह्यात ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले होते. असे असले तरी नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ ६२ शेततळ्यांची कामे पूर्ण झालेली आहेत. शेततळ्यांच्या कामांची टक्केवारी अवघी ८ टक्के आहे. एक प्रकारे शेततळ्यांकडे शेतकºयांनीच पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान] शेततळ्यांसाठी शेतकºयांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे. शासनामार्फत राबविण्यात येणाºया ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत २०१६-१७ व १७-१८  नुसार जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यासाठी १२५ प्रमाणे ५००  शेततळ्यांचे नियोजन कृषी विभाागतर्फे करण्यात आलेले होते. त्यानुषंगाने गत नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामासाठी ६२० शेतकºयांचे ‘आॅनलाइन’ अर्ज प्राप्त झाले. यापैकी १६७ शेतकºयांना शेततळ्यांसाठी कार्यारंभाचे आदेश देण्यात आले. आतापर्यंत फक्त ६२ शेततळे पूर्ण झालेले आहेत. शेततळ्यांची ही टक्केवारी अवघी आठ आहे.सर्वाधिक शेततळी साक्री तालुक्यातजिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला १२५ शेततळ्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुसार सर्वाधिक शेततळी साक्री तालुक्यात (५२) झाली. साक्री तालुक्याच्या आसपास एकही तालुका नाही. धुळे तालुक्यात केवळ सहा, शिंदखेडा तालुक्यात तीन, तर शिरपूर तालुक्यात अवघे एक शेततळे झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद केलेले आहे. आकारमानानुसार निधीशेततळ्यांचे आकारमानही निश्चित करण्यात आले. त्यानुसार सर्वात लहान १५ बाय १५ बाय ३ मीटर  व सर्वात मोठे ३० बाय ३० बाय ३ मीटर आकाराचे हे शेततळे करावयाचे आहे. यासाठी पूर्वी राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत ८२ हजार रुपये अनुदान मिळायचे. तर आता यासाठी ५० हजार रुपये अनुदान देण्यात येत असते. प्रोत्साहित करण्याची गरजजिल्ह्यात यावर्षी शेततळ्यांची संख्या नगण्यच आहेत. त्यामुळे शेततळे निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना कृषी विभागामार्फत प्रोत्साहित करण्याची गरज आहे.