शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी - अनिल घनवट

By admin | Updated: January 14, 2017 00:16 IST

शेतकरी संघटनेच्या पिंपळनेर शाखेतर्फे बैठक; शेती व्यवसाय समृद्ध करण्यासाठी करणार प्रय}

पिंपळनेर :  सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. शेती व्यवसाय समृद्ध करण्यासाठी शरद जोशी यांनी सूचविलेल्या ‘कृषी टास्क’ फोर्सच्या शिफारशी लागू करण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून शरद जोशी यांच्या कृषी टास्क या योजनेविषयी जनजागृती करून त्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे  अध्यक्ष अनिल जयसिंग घनवट यांनी येथे दिली. येथील मराठा मंगल कार्यालयात  शेतकरी संघटनेच्या पिंपळनेर शाखेतर्फे शेतक:यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा नरोडे, धुळे जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील, गुलाबसिंग रघुवंशी, तालुकाध्यक्ष रामकृष्ण बोबले, भटू अकलाडे, आत्माराम देसले, सत्तारसिंग उपस्थित होते. यशस्वितेसाठी शांतूभाई पटेल, पोपटराव कुवर, जगन्नाथ राजपूत, भास्करराव काकुस्ते, शांताराम गांगुर्डे, आत्माराम देसले, निंबा जाधव, रमाकांत गांगुर्डे जगदीश नेरकर, धनराज पाटील, चंदू कोठावदे, दत्तात्रय बेडसे यांनी परिश्रम घेतले. शेतीमालाचे भाव पाडण्याचा कार्यक्रम अनिल घनवट म्हणाले, की शेतक:यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसून या सरकारने शेतीमालाचे भाव पाडण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. त्यामुळे राज्यात शरद जोशी यांच्या ‘कृषी टास्क फोर्सच्या’ शिफारशी लागू करणे गरजेचे आहे. परंतु, तसे होत नसल्याची खंत घनवट यांनी व्यक्त केली. डाळ, हरभरा, गहू, तेलाची आयात व साखर उद्योगावर अनेक र्निबध लादले आहेत. त्यात इथेनॉलच्या किमती कमी केल्यामुळे साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. ‘मेक इन इंडिया’चा आग्रह धरणा:या सरकारला  शेतक:यांच्या प्रश्नाविषयी गांभीर्य नसल्याचे त्यांनी सांगितले. शशिकांत भदाणे यांची निवड बैठकीत अनिल धनवट यांनी शशिकांत भदाणे (पिंपळनेर) यांची शेतकरी संघटनेची तळमळ पाहता उत्तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे उपाध्यक्षपदी निवड केली. तसेच यावेळी शेतकरी संघटनेच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी गुलाबसिंग बाजीराव रघुवंशी, जिल्हा शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीपदी चित्राबाई निंबा जाधव (रा. छाईल, ता. साक्री) यांची निवड करण्यात आली. नोटाबंदीचा शेतक:यांना फटका नोटाबंदीमुळे देशातील शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात  सरकारने पीक कर्जावर दोन महिन्याच्या व्याजावर सूट देऊन जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शेतक:यांनी वीज बिले माफ करा, कर्जमुक्त करा, शेतीविरोधी कायदे रद्द करावेत, असे घनवट यांनी सांगितले. यावेळी ए. के. पाटील यांनी शेतक:यांच्या समस्यासंदर्भात माहिती दिली.