शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:39 IST

गेल्या पाच वर्षात कापसाचे क्षेत्र साडेनऊ हजार हेक्टरने वाढले

ठळक मुद्देजिल्हयात ४ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होतगेल्या पाच वर्षात कापूस लागवडीच्या क्षेत्रात वाढपाण्याअभावी हंगामपूर्व कापूस लागवड घटणार

आॅनलाइन लोकमतधुळे : कापसावर पडत असलेली रोगराई, पाण्याची अनुपलब्धता, अपेक्षित भाव मिळत नसला तरी शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीकडेच आहे. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात कापूस लागवडीच्या क्षेत्रात ९५०० हेक्टर क्षेत्रात वाढ झालेली आहे. त्याचबरोबर सोयाबीन, मका लागवडीचे प्रमाण वाढलेले आहे. तर पाण्याची कमतरता असल्याने, उसाचे क्षेत्र कमी झालेले आहे.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ५६६.३० मिलीमीटर एवढे आहे. जिल्हयात ४ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होत असते.मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून पावसाची अनियमितता आहे. त्यामुळे शेतकºयांनीही पारंपारिक पीके न घेता, कमी पाण्यात, कमी कालावधीत व जास्त उत्पादन देणाºया पिकांची लागवडीला सर्वात जास्त प्राधान्य देण्यास सुरवात केली आहे.शेतकºयांचे पांढरे सोने समजले जाणाºया कापूस लागवडीकडे शेतकºयांचा सर्वात जास्त कल असतो. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात कापूस लागवडीच्या क्षेत्रातही वाढ झालेली दिसून येते. २०१५-१६ मध्ये १ लाख ८८ हजार हेक्टर ५०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. तर १६-१७ या वर्षात ७५०० हेक्टरने वाढ होत १ लाख ९६ हजार ६०० हेक्टरवर कापसाची लागवड झाली. त्यानंतर १७-१८ या वर्षात ९४०० हेक्टरने वाढ होत आता २ लाख ५ हजार ३८३ हेक्टर पर्यंत लागवड करण्यात आली. तर २०१८-१९ मध्ये २ लाख ३२ हजार ७०० व १९-२० मध्येही एवढेच कपाशी लागवडीचे उद्दिष्ट आहे.२०१७-१८ मध्ये कपाशीची २ लाख ५ हजार ३८३ पैकी तब्बल १ लाख ५३ हजार ६५९ हेक्टर क्षेत्रावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. तर गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले असे असतांनाही शेतकºयांचे खरीप हंगामात कापूस लागवडीला प्राधान्य असल्याचे दिसून येते.त्याचबरोबर भाताची लागवडी वाढलेली आहे. २०१५-१६ मध्ये अवघ्या ४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर असलेली भात लागवड १८-१९ या वर्षासाठी ६ हजार हेक्टरवर करण्यात आली होती. तर गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने यावर्षी फक्त ४ हजार ९०० हेक्टरवर भात लागवडीचे उद्दिष्ट प्रस्तावित केलेले आहे. दरम्यान यावर्षी असलेली पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता, हंगामपूर्व कपाशी लागवडीचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. मका लागवडीतून दुहेरी उत्पादन मिळते. मक्या बरोबरच चाराही विक्री होत असतो. त्यामुळे मका लागवडीकडेही कल वाढलेला आहे. त्याचबरोबर बाजरी, ज्वारी, यांचेही क्षेत्र वाढत चालेले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे