शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरद्वारे झटपट पीक पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:21 IST

बैलजोडी व मजूर टंचाई : रब्बी हंगामाचे शेतकऱ्यांना वेध; ज्वारी, गहू, हरभरा पेरणीस सुरुवात

कापडणे : परतीचा पाऊस गेल्याने आता शेतकरी रब्बी हंगामातील पीक पेरणीच्या कामात व्यस्त दिसून येत आहेत. सततच्या चार वर्षापासून कोरडा व यंदाच्या अवकाळी पावसामुळे चारा टंचाई, मजूर टंचाईमुळे बैलजोडी ठेवणे शेतकºयांना परवडत नसल्याने कमी वेळात जास्त क्षेत्रफळात पिक पेरा करण्यासाठी बैलजोडी व मुजरांऐवजी अत्याधुनिक ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतकरी आता रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करताना दिसून येत आहेत.कोरडवाहू रब्बी ज्वारी १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत पेरणी केली जात असते. मात्र सततच्या परतीच्या पावसाने खोळंबा घातल्याने रब्बी हंगामातील पिक पेरणी उशीरा घेतले जात आहे. सध्या ज्वारी पेरणीसही सुरुवात झालेली आहे. या पाठोपाठ हरभरा, मका, दादर, कांदा, पालेभाज्या आदी खरीप हंगामातील पिकांची पेरणी व लावणीस सुरुवात झालेली आहे.कापडणे गावासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या गव्हाची पेरणी जोरात सुरू आहे. सलग तीन महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वच शेत जमिनीत अजूनही मोठ्या प्रमाणात ओलावा आहे. त्यामुळे मजूर व बैलजोडीच्या सहाय्याने शेती तयार करून रब्बी पीक पेरणीसाठी अडचण येत आहे.त्यासाठी झटपट रब्बी हंगामातील पीक पेरणी उरकण्यासाठी ट्रॅक्टरच्या मदतीने शेतकरी गव्हाची पेरणी करताना दिसत आहे. एक बिघा पेरणीसाठी ट्रॅक्टर मालकाला सहाशे रुपये देऊन गव्हाची व खताची सोबत पेरणीचे काम केले जात आहे.खरीप हंगामातील कपाशीचे क्षेत्र जास्त असल्याने रब्बीचे क्षेत्र त्यात गुंतले आहे. मात्र अवकाळी पावसामुळे बहुतांश शेतकºयांच्या शेती पिकांची नासधूस झाली आहे. यामुळे उत्पादित धान्य व चारा खराब झाला आहे. खरिपातील कोणतेही पीक हाती न येण्याची शाश्वती असल्याने बºयाच शेतकºयांनी खराब झालेली कपाशी पिकासह अन्य पिके उपटून फेकली आहेत व त्या रिकाम्या झालेल्या शेतात आता रब्बी हंगामातील गव्हाची पेरणी करताना शेतकरी दिसत आहेत.सलग तीन महिन्यापर्यंत झालेल्या पावसामुळे व परतीच्या मुसळधार पर्जन्यवृष्टीने जमिनीच्या पाण्याची पातळी जास्त वाढली आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामातील पिक पेरा मोठ्या प्रमाणात असणार आहे, यामध्ये मुख्यत्वे गहू, हरभरा, मका, खोंडे, ज्वारी आदी पिके मोठ्या प्रमाणावर असणार आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे