शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यादेखत पिके वाहून गेल्याने शेतकºयाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:53 IST

नवेनगर शिवारातील घटना : विष घेतल्याने रुग्णालयात उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : पुराच्या पाण्यात बंधारे फुटल्याने उभ्या पिकांत पाणी शिरले़ दोन दिवस उलटूनही कोणी पंचनामा करण्यासाठी आले नाही की कोणी दखलही घेतली नाही़ या वैमनस्याने बाधीत झालेल्या शेतकºयाने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची दुर्देवी घटना साक्री तालुक्यातील जेबापूर पैकी नवेनगर शिवारात शनिवारी सायंकाळी घडली़ आपल्या डोळ्यादेखत पिकांचे झालेले नुकसान हा शेतकरी पाहू शकला नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त होत आहे़ साक्री तालुक्यातील जेबापूर पैकी नवेनगर शिवारात रायबा लक्ष्मण बागुल (४०) हा तरुण शेतकरी आपल्या वडिलोपार्जित शेतजमिन कसत आहे़ त्याने आपल्या शेतात सोयाबीन, वालपापडी अशी काही पिके घेतली होती़ नेहमीप्रमाणे त्याचे शेतात काम देखील सुरु होते़ याशिवाय या भागातील शेतकºयांनी देखील विविध पिके आपआपल्या शेतात लावलेली होती़ त्यांच्या शेतजमिनीजवळच पाण्याचे बंधारे आहे़ या बंधाºयामुळे सुध्दा या शेतकºयांना त्याचा फायदाच झाला आहे़ फायदा होत होता़ दैनंदिन शेतीची कामे देखील सुरु होती़अशातच साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यात पाऊस पडायला सुरुवात झाली़ पहाता-पहाता पावसाने जोर धरला़ काही वेळातच पावसाने रौद्ररुप धारण केल्याने  साक्री तालुक्यातील बहुतांश लहान-मोठी धरणे ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली़ पावसामुळे या भागातील बंधारे फुटले़ साहजिकच या बंधाºयाचे पाणी शेतात घुसण्यास सुरुवात झाली़ अल्पावधीतच बंधारेचे पाणी शेतात आल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले़ उभी असलेली पिके अक्षरश: आडवीच झाली़ तरुण शेतकरी रायबा हा हताश झाला होता़ शेतीवरच त्याचे सर्व काही अवलंबून असल्याचे समोर येत आहे़ बंधारा फुटल्यामुळे शेती पिकांचे झालेले नुकसान रायबा आपल्या डोळ्यादेखत पाहत होता़ हताश झाला होता़ या घटनेला दोन दिवस उलटले़ प्रशासनाचे कोणी अधिकारी वा कर्मचारी येतील, नुकसान झालेल्या भागाची पाहणी करतील, पंचनामा करतील, पंचनामानंतर शासनाकडून आपल्याला काही मदत मिळेल अशी बाबडी आशा रायबा धरुन होता़ परंतु या घटनेला दोन दिवस उलटूनही कोणीही इकडे फिरकलेही नाही़ हे रायबा सहन करु शकला नाही़ आपले पुढे कसे होणार असे बहुधा त्याच्या मनात काही प्रश्नांनी घर केले असावे असा अंदाज आहे़ या वैमनस्यातून रायबाने आपल्या राहत्या घरी शनिवारी सायंकाळी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला़ ही बाब लक्षात येताच त्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत़ 

टॅग्स :Dhuleधुळे