लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील दिडशे विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातुन साकारलेल्या आकर्षक चित्रांचे ‘चित्रवेली’ प्रदर्शन पहाण्यासाठी धुळेकरांची गर्दी होत आहे़शाळकरी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, अभ्यासाच्या व्यापातुन विरंगुळा म्हणून कला जोपासता यावी आणि त्या कलेला व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने येथील अजिंठा बहुउद्देशीय प्रतिष्ठाणतर्फे शिवतीर्थ ज्येष्ठ नागरीक भवनात इयत्ता पहिली ते दहावीच्या मुला-मुलींनी काढलेल्या चित्रांचे तीन दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे़ अखिल महाराष्ट्र कलाध्यापक संघटनेचे अध्यक्ष बर्लेकर यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले़ उद्घाटन समारंभानंतर सहभागी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती़प्रदर्शनात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी चार पारितोषिके दिली जाणार आहे़ सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरुप असेल़ तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे़ हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे़ चार तारखेला समारोप होईल़ धुळेकर नागरीकांनी प्रदर्शनाला भेट देवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे़
मुलांच्या कुंचल्यातून साकारली कल्पक चित्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 22:26 IST