शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात बनावट दारू, कारसह १ लाख ७९ हजाराचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 11:24 IST

एलसीबीने केली कारवाई, एक संशयित ताब्यात

ठळक मुद्देएलसीबीने केली धडक कारवाईपावणे दोन लाखांचा ऐवज जप्तएक संशयित ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील शासकीय दूधडेअरी भागातील सहजिवन नगर येथे एलसीबीने छापा टाकत बनावट दारु बनविण्याचे साहित्य, अवैध दारु आणि कार असा एकूण १ लाख ७९ हजार ८५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई बुधवारी करण्यात आली. याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे़ शासकीय दूधडेअरी भागात सहजिवन नगर आहे़ या ठिकाणी एका घराच्या मागे तात्पुरते शेड उभारण्यात आले असून त्यात स्पिरीट, पाणी व फ्लेवर एकत्र करुन बेकायदेशीरपणे देशी आणि विदेशी दारु तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानुसार पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील यांच्यासह सुनील विंचूरकर, महेेंद्र कापुरे, संदिप थोरात, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, आरीफ शेख, गौतम सपकाळ, विजय सोनवणे, रविकिरण राठोड, उमेश पाटील, चेतन कंखरे, मयूर पाटील, महिला पोलीस कविता देशमुख, चालक दीपक  पाटील याशिवाय धुळे शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी, मिलींद सोनवणे, विजय जाधव, मुक्तार मन्सुरी यांनी छापा टाकला़ या कारवाईत बनावट दारुसह तयार करण्याचे साहित्य आणि एमएच ०२ एमए ८१०० क्रमांकाची कार असा एकूण १ लाख ७९ हजार ८५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या प्रकरणी संशयित गणेश नारायण निकम (४०) रा़ प्लॉट नंबर १२, सहजिवन नगर, धुळे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे़ हेड कॉन्स्टेबल सुनील विंचूरकर यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार संशयित गणेश निकम याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला़