शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी प्लॅटफॉर्मवर शौचालय आणि मुतारीची सोय करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 12:46 IST

दोंडाईचा रेल्वे स्थानक समस्या : वाणिज्य निरीक्षकांनी दिली रेल्वे स्थानकास भेट

दोंडाईचा : सुरत - भुसावल रेल्वे मार्गावरील दोंडाईचा रेल्वे स्थानकावरील विविध समस्यासंदर्भाय ‘लोकमत’ गेल्या तीन दिवसापासून वृत्तमालिका प्रसिद्ध केली आहे. त्याची दखल घेतले रेल्वे प्रशासनाचे वाणिज्य निरीक्षकांनी मंगळवारी दोंडाईचा रेल्वे स्थानकाला भेट दिली. पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रवासी प्लॅटफॉर्मवर लवकरच शौचालय व मुतारी सोय करण्यात येईल, असे आश्वासन दिले. दोंडाईचा रेल्वे स्थानकावरील विविध समस्या मांडल्या जात आहे.  अपूर्ण कव्हरशेडमुळे कोटयावधी रुपयांची खते उघडयावर पडून असतात. प्रवासी प्लॅटफॉर्मवर प्राथमिक सुविधाचा अभाव, मालधक्यावर  हमालासाठी सुविधांचा अभाव या समस्या प्रामुख्याने मांडल्यात. त्याची दखल रेल्वेचे  वाणिज्य  निरीक्षक राजकुमार  यांनी घेतली. त्यांनी दोंडाईचा रेल्वे स्टेशनला  प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष खुर्शीदभाई कादियानी, रेल्वे सल्लागार प्रवीण महाजन, संजय अग्रवाल  यांची  भेट घेऊन समस्या जाणून घेतल्यात.  त्यांना असलेल्या अधिकारात असलेल्या समस्या सोडविण्याचे त्यांनी  आश्वासन त्यांनी यावेळी दिले.त्यात स्टेशनचा मधल्या म्हणजे  क्रमांक २ व  3 प्रवासी प्लॅटफॉर्मवर लवकरच  शौचालय व मुतारीची व्यवस्था केली जाणार. डिजिटल टाईम टेबल सारखे टाईम टेबल लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. पाण्याची व्यवस्था लवकरच केली जाईल . माझे अधिकार सीमित आहेत. अन्य समस्या   उत्पन्नावर आधारित असल्यानेत्या वरिष्ठ अधिकारी कडे पाठवल्या जातील असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.  जलद गाड्याचा  डबा स्टेशनवर कुठे लागेल ते प्लेटफॉरवर निर्देशित केले जाणार आहे.  वरिष्ठांच्या समस्यांबाबत रिपोर्ट करणार असल्याचे सांगितले.

 

टॅग्स :Dhuleधुळे