शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

बभळाज परिसरात वादळाने पिकांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:36 IST

पंचनामे करुन पिक विमा द्यावा : बागायतदार संघटनेची तहसीलदारांना निवेदन देवून मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबभळाज : मंगळवारी सायंकाळी निसर्गाने घेतलेल्या रौद्ररुपाने सर्वांचीच फजिती झाली. मात्र शेतकऱ्यांचे अपरिमीत नुकसान झाले आहे. केळी बागा अक्षरश: उद्ध्वस्त झाल्या असून गहू, मका, ज्वारी, बाजरी, टोमॅटो ही पिकेही जमीनदोस्त झाली आहेत.मंगळवारच्या सायंकाळी सुमारे साडेपाच वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होवून आकाशात काळेढग जमू लागले. तेवढ्यात अर्थे, विखरण, शिरपूरला पाऊस सुरू झाला. बभळाज व परिसरातही तुरळक पाऊस सुरु झाल्याचे समजले. अवघ्या काही सेकंदात निसर्गाने रौद्ररुप घेतले. सोसायट्याचा वारा, प्रचंड वेगाचा पाऊस आणि गारा यांनी थैमान घातले. यामुळे अनेकांचे संपूर्ण तर काहींचे थोड्याप्रमाणात नुकसान झाले. केळी बागा कापणीवर असणाºया, नवीन निसवड झालेल्या, कापणी सुरू असलेल्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तर मका, गहू, ज्वारी, बाजरी, टोमॅटो ही सर्व पिके आडवी झाली आहेत.या सर्व परिस्थितीचा महसूल यंत्रणा, कृषी विभाग व पिक विमा कंपन्या यांनी त्वरित पंचनामा करावा व शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.शेतकºयांना नुकसान भरपाई मिळेल यासाठी गांभीर्याने मेहनत घ्यावी, योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी उत्पादक बागायतदार संघटना बभळाज यांनी तहसीलदार शिरपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर मंगलदास गंभीर पाटील, महेंद्र भागवत पाटील, चंद्रकांत भालेराव पाटील, सतिष नामदेव पाटील, अविनाश मगन पाटील, राजेश केशव पाटील, जयपाल उदेसिंग राजपूत व इतर ४४ शेतकºयांच्या सह्या आहेत.दरम्यान यावर्षी रब्बीचे उत्पन्न चांगले होते. मात्र अवकाळी पावसाने त्यावर पाणी फिरविले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे