शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

एक्सपे्रस कॅनॉल ओसंडतोय़़़शेतात पाणी गेल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 12:40 IST

चौगाव शिवार । पाणी आल्याने काही शेतकरी समाधानी तर काहींकडून नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्ककुसुंबा : धुळे तालुक्यातील चौगाव शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळे अडचणीच्या काळात धुळे शहराला पाणी देणारा एक्सपे्रस कॅनॉल ओसंडून वाहत आहे़ त्यामुळे काही शेतकऱ्यांना फायदा झाला असलातरी काही शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे़गेल्या दोन ते तीन दिवसापासून चौगाव या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने सर्व नाले तुडुंब वाहत आहेत. नाल्या काठच्या घरांना ग्रामपंचायतीने सूचना दिल्या आहेत़ धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही़ तसेच शेती शिवारात ही अनेक शेतकºयांच्या शेतात नाल्यांचे पाणी गेल्याने पेरलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे़ त्यात विशेषत: बाजरी, ज्वारी, कापूस, भुईमूग, मका इत्यादी पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे़ भरमसाठ पाऊस झाल्याने तसेच एक्सप्रेस कॅनॉलवरील चौगाव धरण गेल्या दीड महिन्यापूर्वी ९० ते ९५ टक्के भरला होता़ परंतु गुरुवार, शुक्रवारी झालेल्या पावसाने तो १०० टक्के भरला असून धरणाच्या हिरासन नाला व एक्सप्रेस कॅनॉल ओसंडून वाहत आहे. चौगाव धरण ओव्हरफ्लो झाला असून त्याचबरोबर आजूबाजूचे छोटे-मोठे नाले ओसंडून वाहत आहेत़धुळे तालुक्यातील चौगाव शेती शिवारातून एक्सप्रेस कॅनॉल हा जात असल्याने नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने काही शेतकºयांच्या शेतीला फायदा झाला तर काही शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले़ त्यात शेतीचे पिक पाण्यात वाहुन गेले असून नुकसान झालेल्या शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली.शेतकºयाचे नुकसानएक्सप्रेस कॅनॉलला लागुन चौगाव शिवारातील भाईदास लुका पवार यांची शेती असून ती एक एकर इतकी आहे़ त्यात बाजरीची पेरणी करण्यात आलेली आहे़ मुसळदार पावसामुळे कॅनॉलला बºयापैकी पाणी आले आहे़ त्यात या शेतातील संपुर्ण बाजरी पाण्यात वाहुन गेली आहे़ परिणामी या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाईदास पवार यांच्या कुटुंबात ते स्वत: आणि त्यांची पत्नी व दोन मुले आहे असा परिवार आहे.