शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवात भाविकांच्या उत्साहास उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 23:24 IST

सोनशेलू येथील चामुंडा मंदिरातर्फे रक्तदान शिबिर। पेडकाई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

शिंदखेडा/कापडणे : तालुक्यातील सोनशेलू येथील मॉं चामुंडा माता मंदिरावर नवरात्रोत्सवानिमित्त रविवार ६ रोजी अष्टमीच्या दिवशी होमहवन, महाआरती व महाप्रसाद तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा बडगुजर समाज तसेच चामुंडा माता भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन चामुंडा माता ट्रस्ट व समस्त बडगुजर समाज सोनशेलू यांच्यातर्फे करण्यात आले आहे.सोनशेलू येथील चामुंडा माता मंदिरावर दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त अष्टमीच्या दिवशी होमहवन, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. येथील चामुंडा मातेचे मंदिर जागृत देवस्थान असून येथे राज्यासह परराज्यातून समाजबांधवांबरोबरच पंचक्रोषितील नागरीक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात.सालाबादाप्रमाणे यंदाही रविवार ६ रोजी चामुंडा मातेच्या मंदिरावर सकाळी ९ वाजता होमहवन, १०.३० वाजता महाआरती व ११ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच चामुंडा माता ट्रस्ट सोनशेलू व अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बडगुजर प्राऊड ग्रुप, सरस्वती मिशन संस्था व नवोदय युवा मंच यांच्या सहकार्याने सकाळी ११ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमांचा बडगुजर समाज बांधव तसेच मॉं चामुंडा माता भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन चामुंडा माता ट्रस्ट व समस्त बडगुजर समाज सोनशेलू यांच्यातर्फे करण्यात आले आहे.पेडकाई देवी मंदिर २४ तास खुलेकापडणे - खान्देश कुलस्वामिनी आदिशक्ती पेडकाई माता मंदिरावर नवरात्र उत्सवाच्या प्रारंभापासून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.नवरात्रोत्सवाच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. खानदेशातील ३३ कुळांच्या कुलदैवत असणाऱ्या पेडकाई माता मंदिरावर नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची दर्शनासाठी मोठी रीघ लागली आहे. पेडकाई मातेचे मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले करण्यात आले असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सत्तरसिंह गिरासे व सचिव प्रा.भरत काळे यांनी दिली.शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावापासून ५ किलोमीटर अंतरावर सोनगीर - दोंडाईचा रोडावर डोंगरात आदिशक्ती आई कुलस्वामिनी पेडकाईचे भव्यदिव्य मंदिर साकारले गेले आहे व मंदिराला आता नवी झळाळी मिळाली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे