शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षानंतरही मिळाले नाही, रेल्वे स्टेशन राेडवरील अतिक्रमणधारकांना हक्कांच घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 22:35 IST

भाजपाच्या सत्ताधारी नेत्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर निघाले होते अतिक्रमण

धुळे : रेल्वे स्स्टेशनरोड लगत असलेले अतिक्रमण जमिनदोस्त केले. यावेळी अतिक्रमण धारकांना पुर्नवसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सुमारे ३१० घरकूलांपैकी केवळ ८०  पुर्नवसन झाले आहे.  अद्याप २३० अतिक्रमण धारक सत्ताधारी नेत्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्तीची प्रतिक्षा  करीत आहे. महापालिकेकडून काही अतिक्रमण धारकांचे  मोहाडी व साक्रीरोडवरील काही ठिकानी म्हाडाच्या घरात पुर्नवसन केले आहे. मात्र या घरांमध्ये वीज कनेक्शन व मुलभूत समस्या असल्याने अनेकांनी घरांमध्ये जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अन्य नागरिकांना आजही हक्काचे घर नाही.  न्याय न मिळाल्यास पुन्हा त्याच ठिकाणी घरे उभारू असाही इशारा अतिक्रमणधारकांनी दिला आहे. जाहीरनाम्यात आश्वासनेसांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून पांझरा नदी स्वच्छ ठेवणार

शहरात भूमिगत वीज वाहिन्यांचे जाळे तयार करणार

धुळे महापालिकेतील सर्व गटारे भूमिगत करणार

झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावी राबविणार

शहरातील झोपडपटी परिसरातील दर्जदार पायाभूत सुविधा उभारणार

फायर ब्रिग्रेड सुसज्ज व उद्यापत करणार

अद्यापत भाजीपाला मार्केट साकारणार तसेच वाचकांसाठी ई- लायब्ररी 

महिला व पुरूषांसाठी दर्जेदार स्वच्छतागृहे उभारणार

आश्वासनांची सद्यस्थितीशहरातून निघणारे सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे.  शहरातील दाट लोकसंख्येच्या ठिकाणी विज तारांचा धाेका असतांना भूमिगत वीज वाहिन्या शंभर टक्के भूमिगत दिसून येत नाही.  काही भागात भूमिगत गटारी तोडून नव्याने गटारी  तयार केल्या जात आहे. तर काही कॉलनी भागात आजही सांडपाणी रस्त्यावर सोडले जाते.मिल परिसरातील अतिक्रमण धारकांना सात बारा मिळण्याबाबत दीड वर्षापूर्वी ठराव झाला होतो. मात्र अद्याप नागरिकांना न्याय मिळालेला नाही. शहरातील काही भागात फायर ब्रिग्रेडचे वाहन जावू शकत नाही. त्यासाठी लहान वाहन आवश्यक असतांना मनपाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. पाच कंदील भाजी मार्केटचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्यामुळे याठिकाणी सतत वाहतूकीची कोंडी होते. फेरीवाले व अन्य व्यवसायिकांसाठी बैठक व्यवस्था नसल्याने रस्त्यावर बसून दुकान थाटतात. त्यामुळे मनपाकडून पुर्नवसन होणे गरजेचे आहे.विद्यार्था्ना ई-लायब्ररी सुरू करण्याचे आश्वासनाची विसर पडली आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे