शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात उत्साह, तुलनेत शहरी भागात कमी मतदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 23:24 IST

धुळे लोकसभा मतदार संघ :  मतदारांचे पायघड्या टाकून आणि गुलाबपुष्प देऊन  स्वागत

लोकमत आॅनलाईन धुळे : धुळे लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी मतदारांच्या स्वागतासाठी पायघड्या टाकण्यात आल्या होत्या. पुष्पगुच्छ देऊन स्वागतही करण्यात आले. ग्रामीण भागात सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात सकाळी उत्साह चांगला होता. मात्र उन्हाचा चटका जाणवू लागताच मतदान केंद्रांवर शांतता पसरलेली दिसली. धुळे  लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेच्या पाहणीसाठी आयोजित दौºयात विविध ठिकाणी मतदारांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असल्याचे दिसून आले. पर्यटन मंत्रीचे दोंडाईचात मतदानदोंडाईचा येथे नगरपालिका शाळा क्रमाक २ मधील मतदान केंद्रात सकाळी ७ वाजता राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल त्यांच्या पत्नी सुभद्राकुमारी रावल, सरकारसाहेब रावल आणि नगराध्यक्षा नयनकुवर रावल यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला.  आदिवासी बांधवांमध्ये उत्साहशिरपूर तालुक्यात आदिवासी पाडयामध्ये सकाळपासूनच मतदानासाठी उत्साह दिसून आला. तालुक्यातील बोराडी, उमरदा,   दुरबडया याठिकाणी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.मजूर मतदानासाठी आलेविशेषत: गोहाडापाडा येथील २५-३० मजुर  नाशिक येथे वीट कामासाठी गेले होते़   रविवारी रात्री १० वाजेपर्यंत  काम करून पहाटे ते घरी आले़  नंतर ४ किमी अंतर पायपीट करून ते मतदानासाठी आल्याचे पिंट्या पठाण पावरा यांनी सांगितले़ १ मॉकपोलमुळे उशीराने सुरु झाले मतदान - मतदान सुरु करण्यापूर्वी सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत मॉक पोल करण्यात येऊन ५० मते टाकण्यात आले. ते मते उडवून सात वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरु करायची होती. मात्र शहरात तीन मतदान केंद्रावर मॉकपोल ती मते उडविण्यास उशिर झाल्याने १५ मिनीटे उशिरा मतदान  सुरू झाले़ २ मॉक पोल डिलीट केले नसले तरी मतमोजणीवेळी ते वजा करण्यात येतील. व्हीव्हीपॅटचा वापरामुळे ही मते वजा करणे शक्य होईल अन्यथा पुर्नमतदान घ्यावे, लागले असते.३ मालकातर येथील मतदान केंद्रावर सुद्धा मॅकपोल मशिनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने कंट्रोल युनीट बंद पडले. त्यामुळे  २० मिनीटे उशिराने मतदान  सुरु झाले़ विज नसल्याने मोबाईलच्या उजेडात कामशिरपू तालुक्यातील उर्मदा येथे सकाळी ११ वाजता मतदानासाठी  पुरूष व महिला मतदारांच्या  लांबपर्यंत रांगा केल्या होत्या़ याठिकाणी रविवारपासून वीजपुरवठा खंडीत आहे.  वीज नसल्यामुळे मतदान अधिकारी मोबाईलच्या प्रकाशाने मतदारांची यादी शोधत होते़ मतदान केंद्रावर सकाळी ६़३० वाजेपासून महिला मतदारांनी रांगा लावलेल्या होत्या़ याठिकाणी काळापाणी २ किमी तर कढईपाणी ७ किमी अंतरावरून मतदान मतदानासाठी येत होते़याठिकाणी महिला मतदारांमध्ये अधिक उत्साह दिसून आला.कापडणे येथे कंपार्टमेंट बोर्डवरील ठळक नोंदींचा अभावकापडणे येथील मतदान केंद्रात बॅलेट युनिटच्या ठिकाणी मतदान करताना गोपनीयता कायम असावी यासाठी निवडणूक आयोगाने पाठविलेल्या   कंपार्टमेंट  पाठविली आहेत. या कपार्टंमेटवर  निवडणूक आयोगाचे चिन्ह, मतदारसंघाचे नाव व क्रमांक, मतदानाची तारीख, मतदान केंद्राचे नाव व क्रमांक याची माहिती लिहीलेली असते. परंतू  कापडणे येथील एच एस बोरसे हायस्कूल  येथील मतदान केंद्र क्रमांक 68 व 69 या केंद्रातील आकर्षक कंपार्टमेंट वरील महत्त्वाच्या बाबी ठळक अक्षरात दुपारी एक वाजेपर्यंत लिहिलेल्या दिसून आल्या नाहीत.सेल्फीसाठी गर्दीदोंडाईचा येथील नगरपालिका शाळा क्रमांक २ मध्ये मतदानासाठी येणाºया मतदारांना सेल्फी काढण्यासाठी सेल्फी पॉर्इंट होता. या सेल्फी पॉर्इंटवर सकाळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल व सरकारसाहेब रावल यांनीही सपत्नीक फोटो काढले. त्यानंतर मतदानासाठी येणाºया प्रत्येक मतदाराने याठिकाणी फोटो काढण्याचा आनंद घेतला.निरगुडी आदर्श मतदान केंद्रशिंदखेडा तालुक्यातील निरगुडी येथील आदर्श मतदान केंद्रावर येणाºया मतदारांचे स्वागत हे गुलपुष्प देऊन करण्यात येत होते. याठिकाणी सुद्धा दुपारीही मतदारांची रांग लागली होती.

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक