शिरपूर : होळीनिमित्त गेल्या आठवड्यापासून आदिवासी बांधवांचा सुरू असलेल्या भोंगºया बाजाराचा रविवारी रोहिणी (ता.शिरपूर) व सेंधवा (मध्यप्रदेश) येथे भरलेल्या भोंगºया बाजाराने समारोप झालेला आहे. आजपासून (दि. ९ मार्च) मेवादा सणास प्रारंभ होणार आहे.दरम्यान रोहिणी येथे रविवारी भरलेल्या बाजारात आदिवासी बांधवांनी मोठ्या ढोलच्या तालावा नृत्य सादर करून आदिवासी संस्कृतिचे दर्शन घडविले. विविध वस्तू खरेदीतून लाखोंची उलाढाल झाली. दरम्यान उन्हाच्या तडाख्यातही आदिवासी बांधवांचा उत्साह कायम होता. यावेळी एकमेकांना रंगही लावण्यात आला होता.तालुक्यातील रोहिणीसह सेंधवा येथील भोंगºया बाजारात आदिवासी बांधवांनी तोबा गर्दी केली होती़ यानिमित्ताने सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये लहानश्या पाड्यातून आलेल्या आदिवासी बांधवांनी लोकगीत गायन, बासरी व ढोलचा निनाद करत सर्वांचे लक्ष वेधले.रविवारी रोहिणी गावाचा आठवडे बाजाराचा दिवस होता. याशिवाय मध्यप्रदेशातील सेंधवा, पानसेमल, बडवानी, चेरवी, पोखल्या व इंद्रपूर येथेही भोंगºया उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला़ यानिमित्ताने आदिवासी पाड्यांमधून आलेल्या उत्सवप्रिय आदिवासी युवक-युवतींनी बाजारात चांगलीच धमाल केली. आदिवासी तरुणांमधील सळसळता उत्साह आणि त्यांच्या संस्कृतीचे मनमोहक दर्शन घडले़होळीसाठी तयारी ...भोंगºया बाजारात होळीसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आले़ प्रसाद म्हणून दाळ्या, फुटाणे, साखरेचे कंगणहार घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती़ तसेच ओले खजुर घेण्यासाठी देखील गर्दी झाली होती़ सुमारे ३-४ क्विंटल डाळ्यांची विक्री झाली.उन्हाचा कडाकारात्री थंडी असली तरी दिवसा उन्हाचा कडाका बसू लागल्यामुळे थंड पेयाची दुकाने थाटली होती़ रसवंती, आईस्क्रीम, कुल्फी, थंड पाण्याचे पाऊच देखील मोठ्या प्रमाणावर विक्री झालीक़डक उन्हातही उत्साह कायम होता.तरूणाईचा घोळकासेंधवा व रोहिणी येथील या भोंगºया बाजारात तरूण-तरूणी घोळका करीत ढोल-ताशांच्या गजरात नृत्याचा फेर धरीत जल्लोष साजरा केला़ बहुतांशी तरूणाईने एकसारखे ड्रेस व पारंपारिक ड्रेस परिधान केले होते़ तरूणी सुध्दा यात मागे नव्हत्या़रोहिणी येथील बाजारासाठी रोहिणी, भोईटी, खामखेडा, हिगांव, हिवरखेडा, मोरचिड, हातेड, बोमल्यापाडा, बोरमळीपाडा, खंबाळे, धवळीविहिर, अंजनपाडा, भिलाटपाडा, जोयदा, लाकड्या हनुमान, महादेव दोंदवाडा, पनाखेड, खैरखुटी, कोळशापाणी, जामन्यापाडा आदी गावातील पावरा जमातीच्या स्त्री-पुरूषांनी हजेरी लावली़ सेंधवा येथे देखील आदिवासींनी मोठी गर्दी केली होती़होळी, धूलिवंदनाचा उत्साह.सोमवारी होळी सण असल्यामुळे आदिवासी बांधवांचा सकाळपासूनच उत्साह दिसून येत होता. तसेच मंगळवारी धुलीवंदन असल्यामुळे आदिवासी बांधवांनी उत्सवात सहभागी झालेल्या बांधवांना रंग लावून या उत्सवाचा शोभा आणखीनच वाढविली. या वेळी काही आदिवासींनी त्यांच्यातील पारंपरिक कलाविष्कार सादर करत सर्वांनाच थक्क करून सोडले.
उन्हाच्या तडाख्यातही उत्साह कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 23:07 IST