शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

फेरीनिहाय बदलत गेला कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:12 IST

मतमोजणीच्या ठिकाणाचे लाइव्ह चित्रण

धुळे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे गुरुवारी मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर प्रत्येक फेरीनिहाय कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर पडत गेली. आघाडी वाढत गेल्याने उमेदवार विजयाच्या समीप पोहचल्याची खात्री पटताच त्यांच्याकडून विजयाच्या जल्लोषाचे मनोरथ रचले जाऊ लागले. यानंतर अखेरच्या फेरीनंतर विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अभूतपूर्व जल्लोष करण्यात आला..पहिल्या फेरीनंतर...सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या फेरीची मते जाहीर झाली त्यावेळी भाजपाचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांनी सर्वप्रथम १३ हजारांनी आघाडी घेतली. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला तर कॉँग्रेस कार्यकर्त्यांत मात्र शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर पुढीलफेरीत काय होते, याची प्रतीक्षा सुरू झाली. फेरीच्या घोषणेला दिरंगाई झाल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडत होते.सहाव्या फेरीनंतर...सकाळी ९.५० वाजता दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीच्या घोषणेत डॉ.भामरे यांची आघाडी दुप्पट म्हणजे २६ हजार ९०० झाली. तर सहाव्या फेरीनंतर ही आघाडी ९५ हजार ९२७ पर्यंत वाढली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला. मात्र मतमोजणीस्थळी जल्लोष करता येत नसल्याने ते निकालाच्या प्रतीक्षेत दिसले. मीडिया कक्षात ठेवलेल्या टीव्हीवरील बातम्या ऐकण्यासाठीही त्याची गर्दी होत होती. पोलीस येऊन त्यांना तेथून बाहेर पिटाळत होते. मात्र देशातील निकाल, पक्षाची कामगिरी जाणून घेण्याबाबतही पदाधिकारी, कार्यकर्ते सजग दिसले.आठव्या फेरीनंतर...सातव्या फेरीमध्ये डॉ.भामरे यांची आघाडी कमी होऊन ती ३६ हजार ६४९ पर्यंत कमी झाली. तर आठव्या फेरीत ती ११ हजार ७५९ पर्यंत खाली आल्याने भाजपा कार्यकर्त्यांत चलबिचल होऊन चर्चा सुरू झाली. मात्र त्यानंतरही आघाडीत चढउतार होत राहिला. नंतर मात्र ती वाढतच गेली. त्यामुळे दुपारी दीड वाजता डॉ.सुभाष भामरे मतमोजणीस्थळी पोहचले.शेवटच्या फेरीनंतर...अकराव्या फेरीनंतर डॉ.भामरे यांची मतांची आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत वाढत राहिली. यावेळी डॉ.भामरे यांना ६ लाख ९ हजार ४८८ तर कॉँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना ३ लाख ८२ हजार ५४३ मते मिळालेली होती. डॉ.भामरे यांची आघाडी २ लाख २६ हजार ९४५ एवढी झाली होती. त्यामुळे विजयाचा विश्वास बळावला. यावेळी रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, प्रदीप कर्पे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मतमोजणीस्थळाबाहेर येऊन जल्लोष केला.

टॅग्स :Dhuleधुळे