शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धुळे मनपा निवडणूक संपेपर्यंत तिन्ही मंत्र्यांना जिल्ह्यात प्रवेशबंदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:18 IST

अनिल गोटे : राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार, पत्रकार परिषदेत माहिती

ठळक मुद्देआमदार अनिल गोटे यांची पत्रकार परिषदतिन्ही मंत्र्यांना करावी, जिल्हाबंदी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आमदार अनिल गोटे यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांविषयी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाºया आरोपी विनोद थोरातला अटक केल्यानंतर तीन मंत्र्यांच्या स्वीय सहायकांकडून त्याच्या फोनवर फोन आले़ त्याबाबत दोन पोलीस अधिकाºयांमध्ये झालेल्या संभाषणाची सीडी राज्य निवडणूक आयोगाला सादर केली असून संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांना १० डिसेंबरपर्यंत जिल्हाबंदी करावी, अशी मागणी केल्याची माहिती आमदार  अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली़धुळे मनपा  निवडणूकीसाठी भाजपने ७४ जागांपैकी ६२ जागांवर कमळ या अधिकृत चिन्हावर उमेदवार दिले आहेत़ त्यापैकी २८ उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत़ काहींवर ३०२, ३०७, ३९५ यांसारख्या असंख्य गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे़ शहरातील महिलांबद्दल अश्लील मजकूर प्रसिध्द केल्याबद्दलचे अनेक गुन्हे राज्यभरात घडले आहेत़ असा समाजकंटक विनोद थोरात समवेत तीन मंत्र्यांचे व त्यांच्या स्वीय सहायकांचे  अखंड संभाषण सुरू होते़ पोलीस यंत्रणेने त्यास रात्री साडेअकरा वाजता ताब्यात घेतल्यानंतरही तो मंत्र्यांशी व त्यांच्या स्वीय सहायकांशी बोलत होता़ त्याबाबत आपण राज्य निवडणूक आयोगाकडे पुराव्यादाखल सादर केलेल्या सीडीतून हे सिध्द होते की, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल व संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांच्या नावांचाही समावेश गुंडांना संरक्षण देण्यात आहे़ त्यामुळे या तिन्ही मंत्र्यांसह भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, नाना कर्पे व सर्व मंत्र्यांचे स्वीय सहायक यांना जिल्ह्यात प्रवेशबंदी करावी तसेच शासकीय अधिकाºयांचे दुरध्वनी निरीक्षणांखाली ठेवण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ 

टॅग्स :DhuleधुळेAnil Goteअनिल गोटे