महापालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक ठिकाणी मुख्य डीपी रस्त्यांवर अतिक्रमण आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी हाेते. अपघात होतात. शहरातून वाहणाऱ्या नाल्यांच्या दाेन्ही बाजूंना अतिक्रमण आहे. नाल्याला पूर आल्यावर काठावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी शिरते. पर्यायी व्यवस्था नसल्याने गरिबांना धाेका पत्करून नाल्याकिनारी राहावे लागते. शहरातील नाले गाळाने भरले आहे. त्यामुळे दुर्गंधी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नाल्याच्या काठावरील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर देऊन त्यांचे पुनर्वसन करीत सर्व नाले अतिक्रमणमुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात आसिफ इनायत, जमिल मन्सुरी, अकील अन्सारी, गुड्डू काकर, इनाम सिद्दीकी, अमीन पटेल, रशीद शाह, जाकीर खान, अकील शाह, रफिक शाह, इमरान शेख, इरफान शाह, आदी सहभागी झाले.