शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 20:58 IST

जिल्हाधिकारी : पावसाळ्यातील आपत्तींचा सामना करण्याची पूर्वतयारी आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. ग्रामपातळीवरील आपत्ती व्यवस्थापन समित्यांचे सक्षमीकरण करीत या समित्यांची तत्काळ बैठक घेवून आठ दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव यांनी दिले़जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची नैसर्गिक आपत्ती, पूरनियंत्रण, वादळ आदींबाबत मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., उपवनसंरक्षक डी. बी. शेंडगे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर) आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. त्यातच एक जूनपासून सर्व विभागांना पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींसाठी तयार राहावे लागेल. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून घ्यावा. शुध्द पाण्याचा पुरवठा होईल, असे नियोजन करावे.आपत्ती निवारणासाठी आवश्यक साधनसामग्रीची यादी करून ती तपासून घ्यावी. आवश्यकता भासल्यास मॉक ड्रील करुन घ्यावे. मंडळ व धरणांवरील पर्जन्यमापक यंत्रे अद्ययावत असल्याची खात्री करून घ्यावी. प्रत्येक विभागाने स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून त्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला द्यावी. तसेच हा कक्ष २४ तास कार्यान्वित राहील, अशी दक्षता घ्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी धोकेदायक इमारतींचे सर्वेक्षण करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दळण- वळणाची सुविधा कायम राहील, असे नियोजन करीत जिल्ह्यातील पुलांची तपासणी करून घ्यावी.जिल्हा पुरवठा विभागाने नागरिकांपर्यंत वेळेत अन्नधान्य पोहोचविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जलसंपदा विभागाने धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नदी काठावरील गावांना सतर्क करावे. धरणातील जलसाठ्याची अद्ययावत माहिती दररोज सादर करावी.याशिवाय जलविसर्गाचा आराखडा सादर करावा. आपत्ती निवारणासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाची माहिती अद्ययावत ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कोरोनासोबतच आता पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींचा सामना करावा लागणार आहे़मुख्यालयी थांबण्याचे आदेशकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या उपाययोजना आणि आगामी पावसाळा या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांनी मुख्यालयी थांबावे अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड दिल्या़गेल्या वर्षी धुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा दीडपट अधिक पाऊस झाला. सर्व धरणे भरली होती. धुळे शहरातून वाहणाºया पांझरा नदीला पूर आला. अशा परिस्थितीत सर्व विभागांनी समन्वय ठेवत आपत्तीचे निवारण केल्याची आठवण त्यांनी करुन दिली़तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा सादर केला.

टॅग्स :Dhuleधुळे