शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

अकराव्या जलसाहित्य संमेलनाला धुळ्यात सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 14:52 IST

सांस्कृतिक : देशबंधू व मंजू गुप्ता फाउंडेशन व भारतीय जल संस्कृती मंडळातर्फे आयोजन

ठळक मुद्देजलदिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी दिला पाणी वाचविण्याचा संदेश. दोन दिवसीय जल साहित्य संमेलनात ‘खान्देशचे जल’ या विषयावर होणार विचारमंथनरविवार, २१ रोजी दुपारी संमेलनाचा होणार समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  देशबंधू व मंजू गुप्ता फाउंडेशन, भारतीय जल संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अकराव्या जलसाहित्य संमेलनाला धुळे शहरातील देवपूर परिसरातील नकाणेरोडवरील वेदांत मंगल कार्यालयात शनिवारी सकाळी थाटात सुरुवात झाली.  संमेलनाच्या निमित्ताने शनिवारी शहरातील जयहिंद हायस्कूलपासून जलदिंडी काढण्यात आली. या जलदिंडीत जिल्ह्यातील नद्यांचे पाणी एका कलशात संकलित करून त्या कलशाची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी  विद्यार्थ्यांनी 'पाणी हेच जीवन',  'पाण्याचा वापर जपून करावा' असा संदेश दिला. यावेळी स्वागताध्यक्ष रावसाहेब बढे, जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव भामरे, संमेलन समितीचे सचिव डॉ. संजय पाटील, संजय झेंडे आदी उपस्थित होते. शहरातील जयहिंद हायस्कूलपासून जलदिंडीला सुरुवात झाली. पुढे ही दिंडी इंदिरा गार्डन, प्रमोद नगर येथील स्टेट बॅँक आॅफ इंडिया, तुळशीराम नगर, नकाणेरोडमार्गे संमेलनस्थळी आली. मान्यवरांच्या हस्ते उदघाटन जलदिंडीच्या मिरवणुकीची सांगता वेदांत मंगल कार्यालयात झाली. त्यानंतर मंगल कार्यालयात उभारण्यात आलेल्या देशबंधू गुप्ता नगरी येथे  मुकुंद धाराशिवकर विचारमंच येथे संमेलनाचे उदघाटन झाले. यावेळी अध्यक्षस्थानी आंतरराष्टÑीय ख्यातीचे जलतज्ज्ञ तथा संमेलनाचे अध्यक्ष  डॉ. माधवराव चितळे, महाराष्टÑ सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव भामरे, दत्ता देशकर, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, जितेंद्र तलवारे, डॉ. संजय पाटील, जलतज्ज्ञ डॉ. धनंजय नेवाडकर आदी उपस्थित होते. प्रदर्शनाने वेधले लक्षसंमेलनाच्या निमित्ताने मंगल कार्यालयाच्या प्रांगणात जलसाक्षरता प्रदर्शन भरविण्यात आले होते.  या प्रदर्शनातून उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. 

आमदार कुणाल पाटील यांना पुरस्कार जलसंधारणाची कामे करून जिल्ह्यातील शेतीचे क्षेत्र सिंचनाखाली आणणाºया धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते जलगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

पुस्तक प्रकाशनसंमेलनाच्या उदघाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मुकुंद धाराशिवकर लिखित द्रष्टे एम. व्ही. (सर विश्वेश्वरेय्या) या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सूञसंचालन प्रा. सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. आभार जल संस्कृती मंडळाचे गजानन देशपांडे यांनी मानले.