धुळे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची दिवाळीची सुटी एक दिवसाने वाढविण्यात आली आहे. शाळा आता ११ ऐवजी १३ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिली. सुटी वाढवून मिळावी यासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने पाठपुरावा केला होता.जिल्हा परिषदेतर्फे यावर्षी प्राथमिक शाळांना २१ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०१९ अखेर दिवाळीची सुट्टी जाहीर केली होती. ११ नोव्हेंबरपासून प्राथमिकच्या शाळा सुरू होणार होत्या.परंतु आॅक्टोबर महिन्यात निवडणूक आयोगाने विधानसभेची निवडणूक जाहीर केली. त्यात २१ आॅक्टोबर रोजी मतदान असल्याने शासनाने या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर केली. ही सुटी दिवाळीच्या सुट्टीत गणली जाणार होती. म्हणून प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्यावतीने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देवून दिवाळीच्या सुट्टीत अंशता बदल करुन मिळावा अशी मागणी केले होती.त्यानुसार शिक्षण विभागाने १२ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे. आता जि.प.च्या प्राथमिक शाळा १३ नोव्हेंबरपासुन नियमितपणे सुरू होतील. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी वान्मती सी., शिक्षणाधिकारी मनिष पवार, शिक्षण विस्तार अधिकारी मनिषा वानखेडे यांचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद बैसाणे यांनी आभार मानले.या वेळी समन्वय समितीचे सरचिटणीस किशोर पाटील, सदस्य रवींद्र खैरनार, गमण पाटील,नविनचंद्र भदाणे, भगवंत बोरसे, शरद सुर्यवंशी, राजेंद्र नांद्रे, उमराव बोरसे, योगेश धात्रक,विजय पाटील,राजेंद्र भामरे, प्रविण गवळे, हारुण अन्सारी, चंद्रकांत पाटील, राजेंद्र जाधव, मनोहर सोनवणे, मिलिंद वसावे,ईश्वर ठाकरे, ज्ञानेश्वर कंखर, शरद पाटील चंद्रकांत सत्तेसा, प्रवीण भदाणे, सुरेंद्र पिंपळे, भुपेश वाघ, ज्ञानेश्वर बाविस्कर,अनिल तोरवणे, गौतम मंगासे,गणेश वाघ, अफजलखान पठाण,साहेबराव गिरासे, दिनकर पाटील ,राजेंद्र मदन भामरे, सुधिर सोनवणे, रविंद्र सोळंके, नगराम जाधव,अशोक तोरवणे,विनोद वळवी, दत्तात्रय पाटील उपस्थित होते.
प्राथमिकची सुटी एक दिवसाने वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:17 IST