शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आग्रा रोडवर विद्युत डीपीला ट्रकची धडक!

By admin | Updated: February 9, 2017 00:36 IST

मध्यरात्रीची घटना : नियंत्रण सुटलेल्या ट्रकला कारही धडकली, वीजपुरवठा खंडित, दुरुस्तीचे काम सुरू

धुळे :  शहरातील आग्रा रोडवरील कराचीवाला खुंट परिसरात असलेल्या विद्युत डीपीला मध्यरात्री ट्रकने धडक दिली़ त्याचवेळी आग्रा रोडवरून येणारी कारदेखील या ट्रकवर धडकल्याने दुहेरी अपघात झाला़ या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी विद्युत डीपीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आह़े महावितरणतर्फे विद्युत पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आह़ेशहरातील आग्रा रोडवरून मंगळवारी मध्यरात्री सुरतकडून जळगावकडे जाणारा ट्रक (एमएच 05- सीपी 6227) भरधाव वेगाने जात होता़ त्याचवेळी आग्रा रोडवरील कराचीवाला खुंट परिसराजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो चौकातील एका कोप:याला असलेल्या विद्युत पोलसह डीपीवर आदळला़ याचदरम्यान, देवपूर  भागातून मोहाडीकडे जात असलेली एक कार (एमएच 18-टी 401) आग्रा रोडवरून येऊन अपघातग्रस्त ट्रकवर आदळली़ या भीषण अपघातामुळे विद्युत खांबावरील डीपी तुटून खाली पडली़ तर विद्युत खांब पूर्णपणे वाकले, तसेच अनेक तारा व अन्य साहित्याचेही नुकसान झाल़े या अपघातानंतर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला़ या अपघातात ट्रकसह कारचेही मोठे नुकसान झाले आह़े या अपघातामुळे झालेला आवाज व वीजपुरवठा खंडित झाल्याने हा प्रकार तत्काळ आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर आझादनगर पोलीस घटनास्थळी पोहचल़े अपघातग्रस्त ट्रक व कार पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आली़ या घटनेमुळे अपघातस्थळी दिवसभर शहर वाहतूक पोलिसांनी बॅरिकेटींग करून वाहतुकीवर नियंत्रण ठेवले होत़े तर वर्दळीच्या आग्रा रोडवर झालेला हा अपघात पाहण्यासाठीही नागरिकांनी गर्दी केली होती़ रात्री अखेर वीजपुरवठा सुरळीत झाला़अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखलअपघातप्रकरणी हेमराज भरत सूर्यवंशी वय 33, रा़ मोहाडी यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आह़े त्यावरून अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक ओगले करीत आहेत़