शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाचा रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: January 28, 2017 00:24 IST

ध्वजारोहण समारंभ : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील घटना

धुळे : शासकीय अधिका:यासह प्रवीण दंडावाणी यांच्याकडून अत्याचार होत असल्याचा आरोप करत रमेश शंकर चौधरी (वय 65, रा़  गोकर्ण हौसिंग सोसायटी, देवपूर) या ज्येष्ठ नागरिकाने प्रजासत्ताकदिनी शासकीय ध्वजारोहण समारंभावेळी  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला़ पोलिसांनी वेळीच रोखल्याने दुर्घटना टळली़ याप्रकरणी रमेश चौधरी यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़ेयाप्रकरणी पो़ना. सचिन सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी रमेश चौधरी यांच्याविरुद्ध भादंवि कलम 309 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  तपास पोलीस उपनिरीक्षक भारत काळे करीत आहेत़भूखंडातील गैरव्यवहारामुळे टोकाचे पाऊल4रमेश चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, मोराणे प्र.लळींग येथील शेत गट नं. 7/4 हा भूखंड गेल्या 30 वर्षापासून त्यांच्या ताब्यात होता़ या ठिकाणी ते स्पेअरपार्ट व हॉटेल व्यवसाय करीत होत़े मात्र 2013 मध्ये तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अशोक करंजकर, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, मंडळाधिकारी सोमनाथ बागुल यांनी प्रवीण सुरेश दंडावाणी यांच्याशी संगनमत करून हा भूखंड हडप केला़ 14 ऑगस्ट 1989 रोजी विभागीय आयुक्तांनी त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय कुठल्याही भूखंडाचे हस्तांतरण करू नये, असे आदेश दिलेले असतानाही हा भूखंड हस्तांतरित केला गेला़ त्यामुळे आपण तक्रार केली असता आपल्यावर हल्ले करण्यात आल़े याप्रकरणी न्यायालयातदेखील कामकाज सुरू आह़े तक्रार करतो म्हणून पोलिसांकडूनही त्रास सुरू असून चौकशी होत नसल्याने प्रजासत्ताकदिनीच आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला होता़ त्यानुसार त्यांनी सकाळी 8़15 वाजता अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला़