शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

एकवीरादेवी नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 13:09 IST

सकाळी घटस्थापना। जय्यत तयारी पूर्ण; कार्यक्रमांची रेलचेल

धुळे : खान्देश कुलस्वामिनी आई एकवीरादेवीच्या नवरात्रोत्सवास रविवार पासून प्रारंभ होत आहे. २९ सप्टेंबर ते १३ आॅक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव साजरा होणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़रविवारी पहाटे पाच वाजता एकवीरादेवी मंदिरात मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव,व सर्व ट्रस्टी यांच्याहस्ते आरती होईल व सकाळी ८ वा़ घटस्थापना होईल़ दुपारी १२ वाजता महापूजा व महाआरती होईल़ दररोज दुपारी बारा वाजेच्या महाआरती नंतर साबुदाणा खिचडीच्या प्रसादाचे वाटप केले जाणार आहे़नवरात्र उत्सवाच्या काळात दररोज ५ महाआरतींचे आयोजन करण्यात आले आहे़ ललिता पंचमी ३ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता १०१ कुमारी पूजन, रविवारी ६ आॅक्टोबरला नवचंडी यज्ञ व पुर्णाहुती, ७ आॅक्टोबरला महानवमी व सुवासिनी पूजन, ८ आॅक्टोबरला विजया दशमी सिमोलंघन, १३ आॅक्टोबरला कोजागिरी पोर्णीमा उत्सवा निमित्त दुपारी बारावाजेच्या आरती नंतर मंदिर परिसरात भगवतीदेवी पालखी सोहळा, शंखतिर्थ, संध्याकाळी गोरज मुहूर्तावर ५६ भोग नैवेद्य, देवीचा जागरण गोंधळ आयोजित करण्यात आला आहे़नवरात्रोत्सवा निमित्ताने संपूर्ण मंदिराचा परिसरात विद्युत रोशणाई करण्यात आलेली आहे. भाविकांना रांगेत दर्शन घेण्यासाठी रेलिंग व बॅरिकेटसची व्यवस्था करण्यात आलेली आहे नवरात्रोत्सव काळात मंदिर २४ तास खुले राहणार आहे.नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे़ सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव, मधुकर गुरव, मनोहर गुरव, सदाशिव पुजारी यांनी कळविले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे