शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

रॅगिंगसारखे प्रकार टाळण्यासाठी प्रयत्न व्हावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 22:27 IST

डॉ. योगेश सूर्यवंशी  : पालेशा महाविद्यालयात रॅगिंंग प्रतिबंध विषयावर समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन

धुळे : शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे. याठिकाणी विद्यार्थी ज्ञान मिळविण्यासाठी येत असतात. मात्र काही ठिकाणी ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग घेण्याचे प्रकार घडतात. ही एक माननिक विकृती असून, असे प्रकार टाळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. योगेश सूर्यवंशी यांनी येथे केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या विद्यार्थी विकास विभाग आणि धुळे एज्युकेशन सोसायटीचे  पालेशा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  रॅगिंग प्रतिबंधासाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. व्यासपीठावर  प्राचार्या डॉ. आरती सपकाळे होत्या. डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले की, रॅगिंग झालेले कितीतरी तरुण तरुणी एकतर कायमचे तणावात जातात. त्यांच्या जीवनाच्या  मूळ उद्देशापासून  भरकटतात. रॅगिंग विरोधात देशात सक्षम कायदा असूनही काही ठिकाणी रॅगिंगसारख्या घटना घडत आहेत.  रॅगिंग झालेले विद्यार्थी आणि रॅगिंग करणारे विद्यार्थी या दोघांचेही  समुपदेशन करण्याची गरज  आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात ४० टक्के लोकांना समुपदेशनाची गरज आहे.  समुपदेशन झाल्यास कितीतरी वाईट घटना टळू शकतील. सूत्रसंचालन प्रा. निकुंभ यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी  डॉ. शोभा चौधरी, प्रा. गणेश सपकाळे, यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेला विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे