शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मासिक पाळीबाबत प्रभावी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 22:53 IST

महिला आर्थिक विकास महामंडळ : जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनी उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ धुळे अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम तेजस्विनी अभियान, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवून ग्रामीण भागात प्रभावी जनजागृती करण्यात आली़शहरी तसेच ग्रामीण भागात जाणीव जागृतीपर कार्यक्रम राबवून सीएमआरसी स्तरावरुन अस्मिता योजने अंतर्गत सॅनीटरी पॅड वाटप करण्यात आले़ मासिक पाळीत स्वच्छतेचे महत्व विशद करुन उपाययोजनांबाबत महिलांना माहिती देण्यात आली़गृहभेटी देवून किशोरवयीन मुलींना व महिलांना मासिक पाळीविषयी मार्गदर्शन केले़ महिलांना स्वस्त दरात पॅड वाटप केले़ गरिब महिलांना व किशोरवयीन मुलींना मोफत पॅडचे वाटप केले़ मुलींना पॅड मॅन चित्रपट व मासिक पाळी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले़या उपक्रम अंतर्गत उन्नती गटातर्फे १०० पॅड वाटप करण्यात आले़ कल्पतरु गटातर्फे १८०, दिशा ३०, प्रेरणा ३०, आधार १२० आणि श्रमसाफल्य ३३ असे एकूण ४९३ सॅनीटरी पॅड वाटप करण्यात आले़मासिक पाळी ही महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रीया आहे़ यामुळे मातृत्वाचा अनुभव घेता येतो़ मात्र आपल्याकडे याबाबत पूर्वीपासून अनेक गैरसमज पसरले आहेत़ जागतिक आरोग्य संघटनेने २८ मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून जाहीर केला आहे़ हा दिवस अनेकांना माहित नसला तरी जागतिक स्तरावर त्याला फार महत्व आहे़लक्षावधी महिला व मुली या कालावधीमध्ये पूर्ण क्षमतेने काम करु शकत नाहीत़ त्यामुळे जागतिक स्तरावर ही संकल्पना उदयास आली़ समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो़मासिक पाळी स्वच्छता दिनाची सुरूवात प्रथम जर्मनीमध्ये झाली़ ‘वॉश युनायटेड’ या संस्थेने २८ मे २०१४ मध्ये केली़ तेव्हापासून हा दिवस जागतिक स्तरावर मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो़

टॅग्स :Dhuleधुळे