माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुभाष बोरसे यांच्या पदोन्नतीनंतर शिक्षणाधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. या पदाचा पदभार सुरुवातीला प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानंतर, काही दिवसांनी नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्याकडे पदभार सोपवला. पुन्हा काही दिवसांनी औरंगाबादचे बी.डी. चव्हाण यांच्याकडे पदभार देण्यात आला. मात्र, त्यांना वेळ देता येत नव्हता. दुसरीकडे काही दिवसांपासून शिक्षण संघटनांनी पूर्णवेळ अधिकारी नेमावा, अशी मागणी लावून धरली होती. औरंगाबाद येथील चव्हाण यांच्याकडे पूर्वीचे तीन पदभार असताना, औरंगाबाद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचाही पदभार सोपविण्यात आल्यामुळे, त्यांनी धुळ्याचा पदभार स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे आता साक्री तालुक्याचे गटविकास अधिकारी एस.जी. निर्मळ यांच्याकडे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभारी पदभार सोपवण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहे. तेव्हा पूर्णवेळ अधिकारी मिळेल.
तिसऱ्यांदा बदलले प्रभारी शिक्षणाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST