लोकमत न्यूज नेटवर्कतºहाडी : शिरपूर तालुक्यातीलअर्थे परिसरातील शेतकऱ्यांना लुपिन ह्यूमन अॅण्ड रिसर्च फौंडेशन अंतर्गत गांडूळ खत कशा प्रकारे तयार करण्यात येते त्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण घेण्यात आले.शेतकºयांना गांडूळ खत तयार करण्यासाठी गांडूळ खताची ७० बॅग वाटप करण्यात आले. त्यात अर्थे, विखरण, तºहाडी, वरुळ, बलकुवा, वाघाडी येथील शेतकºयांचा सहभाग होता. कार्यक्रमात प्रशिक्षण समाधान बागुल यांनी दिले.प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्याठी लुपिन ह्यूमन अॅण्ड रिसर्च फौंडेशनचे व्यवस्थापक दिनेश पाटील, अर्थे येथील कृषिमित्र देवेंद्र करंके तसेच इतर कृषिमित्र संदीप पाटील, अक्षय पाटील, राहुल पाटील, प्रफुल्ल पाटील, सीमा पाटील, राहुल बोरसे यांनी शेतकºयांना गांडूळ खताविषयी मार्गदर्शन केले.यावेळी शेतकºयांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या शंकांचे निरसन उपस्थित मार्गदर्शकांकडून करण्यात आले.
अर्थे येथे गांडूळ खत करण्याचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:41 IST