शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे विभागात झालेल्या  विविध आंदोलनांमुळे ‘एस.टी’ला ७ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 15:46 IST

वर्षभरात २७ बसगाड्यांचे करण्यात आले नुकसान, प्रवाशांनाही बसली झळ

ठळक मुद्देवर्षभरात झालेले विविध आंदोलनेजमावाने केलेल्या दगडफेकीत बसेसच्या काचा फुटल्यावर्षभरात सात लाखांचे नुकसान

अतुल जोशी। आॅनलाइन लोकमतधुळे  : एस.टी. ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. मात्र देशात अथवा राज्यात कुठलेही आंदोलन झाले, दंगल झाली की अनेकदा संतप्त नागरिकांकडून पहिला दगड एस.टी.वरच भिरकावला जातो. यात एस.टी.चे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. गेल्या वर्षभरात झालेले विविध आंदोलने, बंद यामुळे धुळे विभागात  २७ बसगाड्यांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यात महामंडळाला जवळपास सात लाखांचे नुकसान सोसावे लागले असल्याची माहिती धुळे विभाग नियंत्रक कार्यालयातून देण्यात आली. एस.टी. अर्थात ‘लालपरी’म्हणजे महाराष्टÑाच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून परिचीत आहे. एस.टी. अविरत सेवा देत असते. भाडेवाढ झाली, प्रवासाची अनेक साधने उपलब्ध असली तरी अनेकजण एस.टी.नेच प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. मात्र देशात असो वा राज्यात कुठेही  अप्रिय  घटना घडली तर अनेकदा बंद पुकारले जातात, आंदोलने केली जातात. या आंदोलना दरम्यान अनेकदा दगडफेकीच्या घटना होत असतात. अशावेळी काहीजण एस.टी.वरच पहिला दगडफेक करून आपला संताप व्यक्त करतात. दगडफेकीमुळे बसेसच्या काचा फोडल्या जातात. या शिवाय किरकोळ नुकसानही होत असते. यामुळे महामंडळाला मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे  लागते. जून १७ ते जून १८ या वर्षभराच्या काळात बसेसवर पाचवेळा दगडफेकीच्या घटना घडल्या. यात विभागातील २७ बसगाड्यांचे ६ लाख २२ हजार रूपयांचे नुकसान झालेले आहे. यात ५ जून १७ रोजी शेतकºयांनी संप पुकारला होता. मात्र यात एस.टी.चे नुकसान झाले नव्हते. ९ व १० आॅक्टोबर १७ रोजी खाजगी वाहतुकदारांचा संप होता. या संप दरम्यानही एस.टी.चे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.मात्र २०१८ या वर्षाची सुरवातच एस.टी.च्या नुकसानीनेच झाली. भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद जिल्ह्यातही उमटले. जमावाने २ जानेवारी १८ रोजी जवळपास १३ गाड्यांवर दगडफेक करून काचा फोडल्या. त्यामुळे बसेसचे ३ लाख २९ हजाराचे नुकसान झाले. या घटनेचे पडसाद ३ जानेवारीही रोजीही उमटले. त्यादिवशी ७ बसेसचे नुकसान करण्यात आले. त्यामुळे महामंडळाचे १ लाख ४५ हजाराचे नुकसान झाले. तर ४ जानेवारी रोजी दोन बस गाड्यांवर झालेल्या दगडफेकीमुळे ३५ हजाराचे नुकसान झाले. एप्रिल महिन्यातही आरक्षणासाठी बंद पुकारण्यात आला होता. त्यात २ एप्रिल रोजी विभागातील ५ गाड्यांचे जमावाने नुकसान केले. त्यात महामंडळाला १ लाख १३ हजाराचे नुकसान सोसावे लागले.  

टॅग्स :Dhuleधुळे