शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Vidhan Sabha 2019 : दुरंगी लढतीमुळे चुरस वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 11:49 IST

धुळे ग्रामीण : मनसे रिंंगणाबाहेर, ‘वंचीत’ प्रथमच भाग्य अजमावते

अतुल जोशी ।धुळे : धुळे ग्रामीण मतदार संघात केवळ पाच उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी खरी लढत भाजप विरूद्ध कॉँग्रेस अशीच आहे. दुरंगी लढतीमुळे या मतदार संघात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. कॉँग्रेस आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणार की प्रथमच या मतदार संघात कमळ फुलणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे.धुळे ग्रामीण म्हणजे पूर्वीचा कुसुंबा मतदार संघ. एकेकाळी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेल्या माजी मंत्री रोहीदास पाटील यांचा हा मतदार संघ. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रथमच या मतदार संघावर युतीचा झेंडा फडकला होता. तो एकमेव अपवाद वगळता अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर कॉँग्रेसचेच वर्चस्व राहिलेले आहे. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघात भाजपला आघाडी मिळाली होती. अक्कलपाडा धरण या एका प्रमुख मुद्यावरच धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविली गेली आहे. आताही तोच मुद्दा प्रभावी आहे.विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून एकाही पक्षाला बंडखोरीला सामोरे जावे लागलेले नाही. निवडणूक रिंगणात अवघे पाचच उमेदवार आहेत. जिल्ह्यातील पाच मतदार संघांपैकी फक्त याच मतदारसंघात उमेदवारांची संख्या कमी आहे.२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, भाजप व शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यामुळे मतविभाजन मोठ्या प्रमाणावर झाले होते. परंतु यावेळी युती-आघाडी झालेली आहे. त्यामुळे मतांचे विभाजन टळणार आहे. पूर्वी ही जागा शिवसेनेकडे होती. मात्र यावेळी ती भाजपसाठी सोडण्यात आली. या मतदार संघातून भाजपतर्फे अनेकजण इच्छूक होते. मात्र पक्षाने ज्ञानज्योती भदाणे यांना उमेदवारी दिली. गेल्यावेळी त्यांचे पती मनोहर भदाणे यांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र मोदी लाट असतांनाही या मतदार संघातून कॉँग्रेसचे कुणाल पाटील विजयी झाले होते.गेल्यावेळी मनसेनेही या मतदारसंघातून आपला उमेदवार उभा केला होता. यावेळी मनसे निवडणूक रिंगणातून बाहेर तर वंचीत बहुजन आघाडी प्रथमच भाग्य अजमावत आहे. अर्थात पाच उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे विरूद्ध कॉँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यातच आहे.हा मतदारसंघ कॉँग्रेसचा बालेकिल्ला असून, हा गड शाबूत ठेवण्यासाठी कॉँग्रेसने पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. तर या मतदारसंघात भाजपचे कमळ फुलविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवातच या मतदार संघातून केलेली आहे. त्यावरून मतदार संघात किती चुरस आहे, याची स्पष्ट कल्पना येऊ शकते.कुणाल पाटील दुसऱ्यांदा विधानसभेत जाणार की या मतदारसंघातून पहिल्यांदाच महिला उमेदवाराला विधानसभेत जाण्याची संधी मिळणार, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. अर्थात मतदारांचा कौल महत्वाचा ठरणार असून, ते कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.भाजपच्या प्रचाराचे मुद्देमहिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणारशेती व शेती विकास साधण्यात येणार. बांबू शेतीमधून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणारआर्थिक दुर्बल घटकातील लोकांचा विकास करण्यासाठी प्रयत्नरोजगाराची निर्मिती करणारसिंचनाचा प्रश्न मार्गी लावणार.मत्स शेती, फळ शेती, बांबू शेती यातून शेतकºयांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकºयांना प्रवृत्त करणारकाँग्रेसचे प्रचाराचे मुद्देमतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणारकाळखेडे परिसरातील तलावांचे खोलीकरण करणार, सिंचनाची कामे करण्यावर भरसोनगीर गावाला दररोज पाणी देण्यासाठी प्रयत्न करणारसोनगीर गावाला बसस्थानकाची निर्मिती करणाररोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

टॅग्स :Dhuleधुळे