धुळे : दरवर्षी सणासुदीच्या काळात मिठाईला मागणी वाढल्याने दरवाढ होते. दरवाढीची सुरुवात गणेशोत्सवापासून होते. यंदा मात्र दर स्थिर असल्याने गणेशोत्सवाचा गोडवा वाढला असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या.
दूध आणि साखरेचे दर स्थिर असल्याने दरवाढ झाली नसल्याचे सांगण्यात आले. परंतु मिठाईचे दर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. सध्या दरवाढ नसल्याने दिलासा आहे.
का वाढले नाहीत दर
आमच्या दुकानात मिठाईची दरवाढ झालेली नाही. दूध, साखरेचे दर स्थिर असल्याने गणेशोत्सवाच्या मिठाईचे दर जे होते तेच दर गणेशोत्सवाच्या काळात देखील आहेत. त्यामुळे सर्वांनाचा गणेशोत्सव गोड जात आहे. गेल्यावर्षींपेक्षा यंदा मोदकचे दर वाढले आहेत. - कमल लुंड, मिलन पेढा
का वाढले नाहीत दर
दरवर्षी सणासुदीमध्ये मिठाईची दरवाढ होते. गणेशोत्सवापासून दरवाढीला सुरुवात होते. मोदकांचे दर तर नक्कीच वाढतात. परंतु यंदा मिठाई किंवा मोदकांची दरवाढ झाली नसल्याने गणेशोत्सवाचा गोडवा खरच वाढला आहे.
- शिवाजी जाधव, धुळे
गणेशोत्सवाच्या काळात मिठाईपेक्षा मोदकांची आवश्यकता सर्वाधिक असते. ग्रामीण भागात सहसा घरातच मोदक तयार करण्याकडे महिलांचा कल असतो. काहीजण दुकानातून विकत घेतात. दरवाढ नसल्याने दिलासा आहे.
- सुरेंद्र पाटील, वर्धाने ता. साक्री
भेसळीकडे लक्ष असू द्या
सणासुदीत मागणी वाढल्याने भेसळयुक्त मिठाई बाजारात येते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्न प्रशासन विभाग सक्रिय असतो.