लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तापमानाचा पारा वाढत असल्याने दुपारी वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य दिसू लागली आहेत़ बुधवारी ४३ अंश असलेले तापमान गुरुवारी ४२ अंश होते़ कमी अधिक होणारे तापमानामुळे धुळेकर नागरीक चांगलेच त्रस्त झाले आहेत़ दुपारच्या वेळेस घरातच थांबणे पसंत करत असल्यामुळे साहजिकच रस्त्यावर त्याचा परिणाम झालेला आहे़ उष्णतेची लाट कायमगेल्या १५ दिवसांपासून उन्हाच्या तिव्रतेत कमी-अधिक प्रमाण होत असताना त्यात वाढ होताना दिसत आहे़ त्यात पुन्हा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे़ बुधवारचा पारा हा ४३ अंशापर्यंत जावून पोहचल्याने जनजीवन विस्कळीत झाले़ त्यात पुन्हा वाढ होऊन गुरुवारी तापमान ४२ अंशापर्यंत जावून ठेपले होते़ उष्णतेच्या लाटेमुळे धुळ्यातील रस्ते दुपारी निर्मनुष्य होत आहेत़ उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी लिंबू सरबतला मागणी असल्याने बाजारात लिंबू विक्रीसाठी दाखल झाले आहेत़ शितपेयांना मागणीउन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहरातील चौका-चौकात शीतपेय विक्रेते दाखल झालेले आहेत़ उन्हापासून संरक्षण मिळावे, शरीराला थंडावा मिळावा यासाठी शितपेयांना मागणी वाढली आहे़ दुपारी आणि सायंकाळी शेतपेय स्टॉलवर आता गर्दी होत आहे़ टोपी-रुमालला मागणीउन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी टोप्या, उपरणे, बागायती रुमाल, गॉगल्सचा वापर वाढला आहे़ घराबाहेर निघणे अशक्य झाले आहे़ बहुतांश जणांकडे बागायती मोठ्या आकाराचे रुमाल दिसू लागले आहेत़ उन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दुपारी त्यात अधिक भर पडत आहे़ परिणामी धुळेकर नागरीक शक्यतोअर घराबाहेर दुपारी निघत नसल्याने रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत़ सायंकाळी वाढली गर्दीसकाळपासून जाणवणाºया उन्हामुळे धुळेकर हैराण होत असताना सायंकाळच्या वेळेस रस्त्यावर गर्दी वाढलेली दिसत आहे़ शहरात सर्वदूर हेच चित्र पहावयास मिळत आहे़ प्रकृतीची घ्यावी प्रत्येकाने काळजीउन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी नागरिकांनी अधिक पाणी प्यावे, सुती कपडे वापरावेत, गरज असेल तरच बाहेर पडावे, उन्हाची तिव्रता वाढत असल्यामुळे नागरीकांनी तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे़ उन्हाची तिव्रता कमी-अधिक होत असल्याने घरोघरी कुलर सुरु झाले असल्याचे चित्र आहे़
वाढत्या तापमानामुळे धुळेकर बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 23:16 IST