शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्य़ात मिरचीची आवक वाढल्याने दरात घसरण

By admin | Updated: May 20, 2017 17:26 IST

निसर्गाचीही योग्य साथ मिळाल्याने यावर्षी तब्बल 19 पट मिरचीची आवक वाढली आहे.

ऑनलाइन लोकमतदोंडाईचा, धुळे, दि. 20 -   कापसाला हमी भाव न मिळाल्याने दोंडाईचासह परिसरातील शेतकरी मिरची उत्पादनाकडे वळला. परिणामी परिसरात मिरचीचे क्षेत्र वाढले. मिरची लागवडीनंतर निसर्गाचीही योग्य साथ मिळाल्याने यावर्षी तब्बल 19 पट मिरचीची आवक वाढली आहे. मात्र आवक वाढली असली तरी बाजारपेठेत मिरचीचे भाव गडगडल्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी दोंडाईचासह परिसरातील अनेक शेतक:यांनी  मिरची लागवडीवर भर दिला. त्यामुळे यावर्षी मिरचीची आवक प्रचंड वाढली. मात्र, गत वर्षाच्या तुलनेत सुमारे 900 रुपये भाव कमी झाल्याने शेतक:यांचे आर्थिक गणित बिघडले असून त्यामुळे शेतक:यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. दोंडाईचा बाजार समितीत मिरचीची आवक लक्षणीय असते. येथील मिरची उद्योग खान्देशात आघाडीवर आहे. शिंदखेडा रस्त्यावर 10 ते 11 ठिकाणी मिरची वाळवण्याच्या पथारी आहेत. सुमारे 400 अकुशल कामगारांना रोजगार यामाध्यमातून मिळत आहे. सहा महिने कामगारांना हे काम करावे लागत असल्याने त्यांच्याही कुटुंबाचा गाडा पुढे रेटण्यात त्यांना अडचणी येत नाही. तसेच येथे तयार होणारी मिरची पावडर परदेशातही पाठविली जाते. 2015-16 ला 3 हजार 888 क्विंटल मिरचीची आवक झाली. त्यामुळे बाजारात 1 कोटी 15 लाख 33 हजार 940 रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती. त्यावेळी सरासरी प्रति क्विंटल 2 हजार 966 रुपये भाव होता. यावर्षी म्हणजे 2016-2017 या आर्थिक वर्षात 77 हजार 215 मिरचीची आवक झाली असून बाजारात 15 कोटी 86 लाख 48 हजार 492 रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. मिरचीचा सरासरी प्रति क्विंटल दर 2 हजार 55 रुपये होता.  निसर्गाची कृपा, मिरची लागवडीचे वाढलेले क्षेत्र, बळीराजाने योग्य वेळी मात्रानुसार दिलेले खत, पाणी किटकनाशके, त्यामुळे मिरचीचे उत्पादन वाढले. गत वर्षापेक्षा यावर्षी मिरचीचे उत्पादन म्हणजे आवक तब्बल 19 पटीने वाढली आहे.  उत्पादन वाढले असले तरी भाव गडगडल्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसत आहे.  दोंडाईचालगत परिसरात असलेल्या मिरचींच्या पथारीवर सुमारे 400 अकुशल कामगारांना नोव्हेंबर ते मे असे सहा महिने रोजगार मिळतो. ओली मिरची खुडण्यासाठी एका मनाला 40 रुपये तर कोरडी मिरची खुडण्यासाठी एका कामगाराला 200 रुपये मजुरी मिळते. दोंडाईचा येथील मिरची राजस्थान, गुजरातसह गुंटुरला विक्रीसाठी पाठविली जाते.  यावर्षी गुटुंर येथील बाजारपेठेतही मिरचीचे भाव कमी मिळाले आहे. गेल्यावर्षी दंडी कट मिरची 150 ते 200 रुपये दराने मिळत होती. यावर्षी 900 ते 100 रुपये असा भाव मिळाला आहे.  दोंडाईचा शिवार व परिसरातील पथारीवर कामगार भर उन्हात मिरचीच्या बी जमा करण्याचे काम करत आहेत. मिरचीची बी 25 रुपये किलोने विकली जाते. तिखटामध्ये टाकण्यास व मिरचीचे रोप तयार करण्यासाठी ही बी उपयुक्त ठरते.