शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग चौपदरीकरणाच्या कामामुळे पाटचा:या नष्ट

By admin | Updated: May 23, 2017 16:31 IST

सुरत-नागपूर महामार्ग चौपदरीकरण : फडबागायतीपासून वंचित राहण्याची शेतक:यांवर येणार वेळ

 ऑनलाईन लोकमत

साक्री,दि.23- सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. मात्र या कामामुळे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मालणगाव धरणापासून निघणा:या पाण्याच्या पाटचा:या व कान नदीवरील अनेक गावांच्या शिवकालीन बंधा:यांच्या पाटचा:यांमध्ये मातीचे ढिग व महामार्गावरील तोडण्यात आलेले वृक्ष फेकून दिल्यामुळे पाटचा:या उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.  यामुळे भविष्यात तालुक्यातील बहुतांश शेतक:यांवर फडबागायतीपासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. 
साक्री तालुक्यात कान नदीवरील अनेक गावांना शिवकालीन बंधारे आहेत. त्यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येते. परंतु,  सध्या या फडबागायतीच्या पाटचा:यांलगत अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. परिणामी, या पाटचा:या बुजल्या जात आहेत. यामुळे तालुक्यातील शेतक:यांना पाटचा:यामंधून मिळणारे पाणी हे भविष्यात मिळणे बंद होणार असून त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. 
लहान शेतक:यांसाठी फडबागायत सोयीची 
कान नदीच्या उगमापासून अनेक गावांच्या बंधा:यांमुळे येथील फडबागायतीला एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे कान नदीकाठावरील 15 ते 20 गावांच्या शेतकरी, शेतमजुरांचा फायदा होतो. सर्वसाधारण शेतकरीही विहिर, विद्युत मोटर, विद्युत बिल, स्वतंत्र रखवलदार आदींचा खर्च न करता 10 गुंठय़ांपासून एक दोन एकर क्षेत्र अगदी अत्यल्प खर्चात बागायत करून दोन पिके सहज काढत असतात. ही फडबागायत जीवंत ठेवणे लहान शेतक:यांना परवाडणारी व काळाची गरज झाली आहे.
पाटचा:यांचे काम पर्ववत करा!
फडबागायत जिवंत ठेवण्यासाठी महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे तोडण्यात आलेल्या पाटचा:यांचे काम पूर्ववत व्हावे, अशी मागणी बाबूलाल पवार, बापूसाहेब भंडारी, नवल नांद्रे, जी. के. नांद्रे, किशोर पवार, संदीप पवार, भालचंद्र पवार, जितेंद्र भंडारी, दिनेश देसले, संजय सोनवणे आदी  शेतक:यांनी केली आहे.